AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? खरातप्रकरणी अतुल कुलकर्णीचे विचार करायला लावणारे सवाल

नाशिकच्या भोंदुबाबा अशोक खरातप्रकरणी अभिनेता अतुल कुलकर्णीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित महत्त्वाचे आणि विचार करायला भाग पाडणारे प्रश्न उपस्थित केले आहेत. अतुल कुलकर्णीची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? खरातप्रकरणी अतुल कुलकर्णीचे विचार करायला लावणारे सवाल
Ashok Kharat and Atul KulkarniImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 22, 2026 | 11:04 AM
Share

स्वत:च्या अंगात दैवी शक्ती असल्याचं सांगून महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात सध्या अटकेत आहे. याप्रकरणी अनेकांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. संशयित खरातच्या भोंदुगिरीविरोधात अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही आक्रमक भूमिका घेतली आहे. खरातच्या अटकेनंतर 58 रहस्यमय व्हिडीओ पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यामध्ये अनेक बड्या हस्ती तसंच राजकीय नेत्यांचाही संबंध असण्याची अंनिसला दाट शंका आहे. सध्या अशोक खरात प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. याप्रकरणी आता मराठी अभिनेता अतुल कुलकर्णीने मार्मिक पोस्ट लिहिली आहे. एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहित त्याने या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाचे आणि विचार करायला लावणारे प्रश्न उपस्थित केले आहेत.

पकडलं गेल्यावरच आणि त्यानंतरच एखादी व्यक्ती भोंदू ठरते का, मग त्याआधी ते काय असतात, शिवाय जे कधीच पकडलेच जात नाही, ते कोण असतात.. असा सवाल अतुल कुलकर्णीने त्याच्या पोस्टद्वारे केला आहे. अशा भोंदूबाबांचे भक्त आणि त्यामागील राजकारण, धर्मकारण यांवरही त्याने टीका केली आहे. अशा भोंदूबाबांवर आंधळी श्रद्धा ठेवणाऱ्या भक्तांनाही त्याने फटकारलं आहे. अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे, असा प्रश्न अतुलने विचारला आहे.

अतुल कुलकर्णीची पोस्ट-

‘पकडले गेले कीच आणि तरच ‘भोंदू’? त्या आधी ते काय असतात? आणि जे कधी पकडलेच जात नाहीत ते? ज्या वेळी कुणी ‘महाराज’ भोंदू ‘निघतात’, तेव्हा त्यांचे भक्त नेमके कोण होतात? भागीदार, पीडित, आंधळे, अंधश्रद्धाळू, कमनशिबी, भाबडे, मूर्ख की आणखी कुणी? हे सगळं जितकं धर्मकारणाला लागू होतं (कुठल्याही धर्माच्या) तितकंच ते राजकारणालाही लागू होतं का (कुठल्याही पक्षाच्या)?, असा सवाल त्याने केला आहे.

या पोस्टमध्ये त्याने पुढे विचारलंय, ‘श्रद्धा अंध कधी होते? डोळस श्रद्धा म्हणजे काय? डोळस आणि अंधश्रद्धा यामधे अंतर किती असतं? अंध होण्याला कारणीभूत कोण असतं? करणारे की होणारे? आंधळं होणाऱ्यांवर त्याची काही जबाबदारी असते की नसते?’

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?