Parth Samthaan च्या Ex ने थेट तिच्या छातीवर…., अभिनेता पाहून घाबरला, म्हणाला- माझी गर्लफ्रेंड….
अभिनेता पार्थ समथानने त्याच्या गर्लफ्रेंडबाबत एक मोठा खुलासा केला आहे. ज्यामध्ये त्याने त्याच्या गर्लफ्रेंडने केलेल्या एका धक्कादायक कृतीबद्दल सांगितलं आहे.

Parth Samthaan : हिंदी टेलिव्हिजन विश्वातील हँडसम अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे पार्थ समथान. प्रचंड मोठा चाहता वर्ग असलेला पार्थ तरुणाईचा सर्वात आवडता मानला जातो. सोशल मीडियावर सातत्याने सक्रिय असलेला पार्थ अनेकदा चर्चेत असतो. अनेक तरुणींना आपला बॉयफ्रेंड हा पार्थसारखाच असावा असे वाटत असते. मात्र, पार्थच्या वैयक्तिक आयुष्याबाबत, विशेषतः त्याच्या गर्लफ्रेंडबद्दल आजही ठोस माहिती समोर आलेली नाही.
मात्र, एका मुलाखतीदरम्यान पार्थने आपल्या एक्स गर्लफ्रेंडबाबत केलेला खुलासा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. पार्थने तिचा उल्लेख थेट सायको गर्लफ्रेंड असा केला होता. हा संपूर्ण किस्सा त्याच्या शालेय जीवनातील असल्याचे त्याने सांगितले.
पार्थने सांगितले की, शाळेत असताना अनेक मुलींना तो आवडायचा आणि त्याच काळात तो एका मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये होता. मात्र, ही मुलगी त्याच्यावर इतकी वेडी होती की तिचं वागणं त्याला घाबरवणारं ठरलं. एका दिवशी तिने आपल्या छातीवर कर्कटक वापरून पार्थचं नाव कोरल्याचं पाहून तो अक्षरशः हादरून गेला. असं वागणं फक्त मनोरुग्ण लोकच करू शकतात असं त्याने स्पष्ट शब्दांत म्हटलं.
पुढे पार्थ म्हणाला की, त्यानंतर त्याने त्या मुलीला समजावून सांगितलं आणि मग तिच्याशी कायमचं बोलणं बंद केलं. याच अनुभवातून शिकून तो आपल्या चाहत्यांनाही एक महत्त्वाचा संदेश देतो. प्रेम करत असाल तर ते सन्मानपूर्वक करा. कोणाच्याही इतक्या अधीन जाऊ नका आणि प्रेमाच्या नावाखाली धोकादायक किंवा सायकोगिरीसारखं वागणं टाळा असा सल्ला पार्थने दिला.
मराठी असल्याचा खुलासा
दरम्यान, काही काळापूर्वी पार्थचे नाव अभिनेत्री दिशा पाटणी हिच्याशी जोडले गेले होते. मात्र, या चर्चांवर कधीही अधिकृत दुजोरा मिळाला नाही आणि नंतर दोघांमधील नात्याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही.
पार्थबद्दल आणखी एक विशेष बाब म्हणजे, काही दिवसांपूर्वी झूमला दिलेल्या मुलाखतीत त्याने आपण मराठी असल्याचा खुलासा केला होता. अनेकांना गैरसमज आहे की मी नॉर्थ इंडियन आहे पण मी मराठी आहे. मी पुण्याचा आहे. लोकांनी हे समजून घ्यायला हवं की मी मराठीच आहे असं त्याने स्पष्ट केलं.
सध्या पार्थ एका हिंदी मालिकेत काम करत असून नुकतीच त्याची लोकप्रिय मालिका ‘सीआयडी’ मध्ये विशेष एंट्री पाहायला मिळाली होती. या मालिकेमध्ये त्याने एसीपीची भूमिका साकारली होती. मात्र, ही एंट्री ठराविक कालावधीसाठीच होती.
