AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samir Soni | मी सुद्धा आत्महत्या करु शकलो असतो, पण…. : अभिनेता समीर सोनीची पोस्ट

सोशल मीडियावर समीर सोनीची पोस्ट व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्याच्या मताचं समर्थन केलं आहे तर काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत (Samir Soni on Sushant Singh Rajput suicide).

Samir Soni | मी सुद्धा आत्महत्या करु शकलो असतो, पण.... : अभिनेता समीर सोनीची पोस्ट
| Updated on: Jun 18, 2020 | 10:37 PM
Share

मुंबई : अभिनेता सुशातसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे (Samir Soni on Sushant Singh Rajput suicide). बॉलिवूडमधील दिग्गज कलाकार, निर्माते आणि दिग्दर्शकांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर दु:ख व्यक्त केलं. याशिवाय काही कलाकारांनी सुशांतच्या आत्महत्येनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले. तर काहींनी बॉलिवूडमधील घराणेशाहीवर टीका केली. दरम्यान, अभिनेता समीर सोनी यानेदेखील सोशल मीडियावर सुशांतच्या आत्महत्येवर प्रतिक्रिया दिली (Samir Soni on Sushant Singh Rajput suicide). यावेळी त्याने सुशांतच्या आत्महत्येवर दु:ख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली.

“सुशांतच्या आत्महत्येनंतर मला सांगायचं आहे की, मी स्वत:देखील भरपूर अस्वस्थ आहे. मला माहित आहे की, मी असो, सुशांत किंवा इतर कुणीही असो, आत्महत्येचा विचार करु शकतं, कारण तशाप्रकारचं प्रेशर असतं. पण, मी माझ्या गेल्या 20 वर्षांच्या कारकिर्दीत समजून घेतलं की, परमेश्वर सगळ्यांना समान संधी देत नाही. मग बॉलिवूड, राजकारण किंवा तर कुठलाही व्यवसाय असो. मला कुणालाही दोष देणं, योग्य वाटत नाही. याउलट कठीण परिस्थितीचा सामना करणं योग्य”, असं समीर सोनी म्हणाला.

View this post on Instagram

A post shared by Samir Soni (@samirsoni123) on

बॉलिवूडमध्ये सुशांतसारखे अनेक कलाकार तणावात आहेत, हे समीर सोनीच्या या पोस्टमधून जाणवत आहे. समीर सोनीची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. अनेकांनी त्याच्या मताचं समर्थन केलं आहे तर अनेकांनी प्रश्न विचारले आहेत.

सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांचा तपास सुरु

दरम्यान,  सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी वेगवेगळ्या चार तपास यंत्रणा चौकशी करत आहेत. पोलीस अनेकांचे जबाब नोंदवत आहेत. वांद्रे पोलिसांनी आज सुशांत सिंह राजपूतची मैत्रीण रिया चक्रवर्तीचाही जबाब नोंदवला. रिया चक्रवर्ती आज सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल झाली. (Rhea Chakraborty reaches Bandra Police station). रिया ही सुशांतची मैत्रीण आहे. सुशांत तिच्या संपर्कात होता. त्यामुळे सुशांतच्या आत्महत्येचं कारण काय असू शकतं, याबाबत पोलीस तिच्याकडे विचारणा करु शकतात.

पोलिसांनी जवळपास 9 तास रिया चक्रवर्तीचा जबाब नोंदवून विचारपूस केली. सकाळी 11 च्या सुमारास वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या रियाचा जबाब संध्याकाळी पावणे सहाच्या सुमारास संपला. 9 तास पोलीस तिच्याकडून माहिती घेत होते. अनेक महत्त्वाच्या विषयांवर रिया हिला विचारण्यात आलं. रियाने पोलिसांना सविस्तर उत्तरं दिली. या जबाब नोंदणीनंतर आता संंबंधित विभागाचे डीसीपी हे सुद्धा  रियाकडे चौकशी करण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : मालकाच्या अकाली निधनाचा मूक जनावरालाही धक्का, सुशांतच्या लाडक्या कुत्र्याने जेवणही सोडलं

त्याआधी पोलिसांनी काल कास्टिंग डायरेक्ट मुकेश छाब्राचा जबाब नोंदवला गेला. मुकेश हा सुशांतचा पहिला मेंटॉर होता. सुशांत हा चित्रपटाच्या स्क्रिप्टबाबत नेहमी मुकेशसोबत चर्चा करायचा. सुशांतला फोनवर बोलायला आवडत नव्हतं. त्याला गेम खेळायला आवडायचं. सुशांत मित्रांचे फोनही घ्यायचा नाही. 27 मे रोजी मुकेशचा वाढदिवस होता. त्यावेळी सुशांतने त्याला फोन केला होता. सुशांतला अनेक चित्रपट मिळाले होते, अशी माहिती यावेळी समोर आली.

सुशांतच्या चार पाच डायऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्याचा अभ्यास करणं सुरु आहे. त्यात त्याने जनरल लिहलं आहे. वाचताना काही चांगला विचार असेल तर तो ते नमूद करायचा. सुशांत हा 150 ड्रीमवर काम करत होता.

आर्थिक आणि त्याच्या फिल्मशी संबंधित व्यवहार बघणाऱ्या काही लोकांना आम्ही चौकशीसाठी बोलवणार आहोत. सुशांतची मैत्रीण रिया हिलाही चौकशीसाठी बोलावणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं होतं.

पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.