AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिनेते सतीश शाह यांचे निधन, शेवटच्या श्वासापर्यंत जोडीदाराला साथ; एकूण संपत्ती किती?

ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे वयाच्या 74 व्या वर्षी किडनीच्या आजारामुळे निधन झाले. 250 हून अधिक चित्रपट आणि 'साराभाई व्हर्सेस साराभाई' सारख्या मालिकांमधून त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांच्या जाण्याने नक्कीच सर्वांना धक्का बसला आहे. दरम्यान सतीश यांच्या कुटुंबात कोण कोण असतं? त्यांची पत्नी काय करते? तसेच त्यांची संपत्ती किती जाणून घेऊयात.

अभिनेते सतीश शाह यांचे निधन, शेवटच्या श्वासापर्यंत जोडीदाराला साथ; एकूण संपत्ती किती?
Actor Satish Shah passes away; Who is in his family and how much is his total wealth?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 25, 2025 | 5:11 PM
Share

मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आणि सर्वांच्याच मनाला चटका लावून गेली. ती म्हणजे आजवर अनेक मालिका आणि जवळजवळ 250 चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला. 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:30 वाजता मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते 74 वर्षांचे होते . अभिनेता बऱ्याच दिवसांपासून किडनीशी संबंधित आजाराने त्रस्त होते. अलीकडेच त्यांचे किडनी प्रत्यारोपणही झाल्याचं म्हटलं जातं. पण अखेर याच आजाराने त्यांचं निधन झालं.

मुंबईत जन्मलेले सतीश शाह हे एका गुजराती कुटुंबातले

सतीश शाह यांनी अशी लोकप्रियता मिळवली आहे जी क्वचितच कोणत्याही विनोदी अभिनेत्याला मिळते. 25 जून 1951 रोजी मुंबईत जन्मलेले सतीश शाह हे एका गुजराती कुटुंबातून आहेत. त्यांनी मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि नंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FIIT) मध्ये अभिनयाचे शिक्षण घेतले.

1978 चित्रपटातून पदार्पण

एफटीआयआय नंतर सतीश शाह यांनी थिएटरमध्येही काम केले. त्यात सतीश कौशिक आणि नसीरुद्दीन शाह सारखे प्रमुख कलाकार होते. त्यांनी 1978 ला ‘अजीब दास्तान’ या चित्रपटातून पदार्पण केले. त्यांनी “साराभाई विरुद्ध साराभाई”, “जाने भी दो यारो” आणि “मैं हूं ना” या चित्रपटांमधील भूमिकांसाठी जास्त लोकप्रियता मिळवली होती.

सतीश शाह यांचे कुटुंब 

सतीश शाह यांनी 1982 मध्ये फॅशन डिझायनर मधू शाह यांच्याशी लग्न केले. वृत्तानुसार, या जोडप्याला मुले नव्हती. आयुष्यभर या जोडप्याने एकमेकांना भक्कम साथ दिली आणि सतीश यांनी याद्दल कोणत्याही मुलाखतीत यावर भाष्य केले नाही. त्यांनी नेहमी आपल्या कामालाच प्राधान्य दिलं.

सतीश शहा यांची एकूण संपत्ती किती?

सतीश शाह यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात अरविंद देसाई यांच्या ‘अजीब दास्तान’ या चित्रपटातून केली होती. त्यानंतर ते ‘ये जो जिंदगी है’ सारख्या टीव्ही मालिकेमध्ये दिसले. सतीश शाह यांनी अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन मालिकांमधून मोठी संपत्ती कमावली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांची एकूण संपत्ती सुमारे 5.5 कोटी असल्याचं म्हटलं जात आहे.

चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.