AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

11 वर्षानंतर अभिनेता झळकणार झी मराठीवरच्या मालिकेत; म्हणाला, प्रोमो पाहून प्रेक्षकांना…

Actor Sunil Barve in Paru Serial : अभिनेता सुनील बर्वे 11 वर्षानंतर पुन्हा एकदा झी मराठीवर झळकणार आहे. 'पारू' मालिकेत तो दिसणार आहे. या मालिकेचा नवा प्रोमो समोर आला आहे. 'पारू' मालिकेच्या टीम सोबत सातारा मध्ये काम करण्यास उत्सुक आहे, असं तो म्हणाला. वाचा सविस्तर...

11 वर्षानंतर अभिनेता झळकणार झी मराठीवरच्या मालिकेत; म्हणाला, प्रोमो पाहून प्रेक्षकांना...
सुनील बर्वेImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 26, 2024 | 1:24 PM
Share

झी मराठीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. अल्पावधित प्रेक्षकांची पसंतीस उतरलेली मालिका ‘पारू’ या मालिकेमध्ये अहिल्यादेवींच्या भावाची म्हणजेच सयाजीरावची एन्ट्री झाली आहे. मराठीतील लाडका अभिनेता सुनील बर्वे झी मराठीवर 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा पदार्पण करत आहे . या निमित्ताने सुनील याने झी मराठीसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. तसंच नव्या मालिकेतील कामाबाबतची उत्सुकताही त्याने बोलून दाखवला आहे. 11 वर्षानंतर पुन्हा झी मराठीसोबत काम करण्याचा अनुभव सुनील बर्वे याने शेअर केला. सयाजीरावचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना नरसिंहरावची आठवण आली, असं सुनील बर्वे म्हणाला.

सयाजीरावच्या भूमिकेसाठी मला खूप छान प्रतिसाद मिळत आहे. जेव्हा ‘पारू’ मालिकेतील सयाजीरावचा प्रोमो आला. तेव्हा खूपजण म्हणत होते की नरसिंहराव परत आला! . प्रेक्षकांना अजूनही माझी 11 वर्षापूर्वीची ‘कुंकू’ मालिका लक्षात आहे . मला खूप आनंद झाला की लोकांच्या हृदयात ती मालिका आणि माझी भूमिका अजून ही ताजी आहे. मला जेव्हा ‘पारू’ मालिकेसाठी कॉल आला भूमिकेबद्दल सांगितले तेव्हा काही तरी नवीन करायला मिळणार आहे, याचा आनंद झाला, असं त्याने सांगितलं.

सुनील बर्वेने सांगितला मालिकेतील अनुभव

प्रेक्षकांना मला स्क्रीनवर पाहिल्यावर नरसिंहची आठवण आली असेल पण सयाजीराव, खूप वेगळा आहे. सयाजीराव जरी गावचा कर्ताधर्ता असला तरी, एक माणूस म्हणून नरम स्वभावाचा आहे आणि तोच वेगळेपणा मला या भूमिकेसाठी ऊर्जा देत आहे. ‘पारू’ च्या कलाकार टीम मध्ये बहुतेक नवीन पिढी आहे त्यांच्या सोबत आणि त्यांच्या पद्धतींनी काम करण्याची मला उत्सुकता आहे. टीव्ही माध्यमात बराच बदल झाला आहे. ती काम करण्याची पद्धत मला आत्मसात करून घ्याची आहे. खूप उत्सुक आहे मी त्यांच्यासोबत काम करायला. मुळात सातारा शहर खूप सुंदर आहे. मी नवीन गोष्टींसाठी नेहमीच उत्सुक असतो, बदल अपरिहार्य आहे असे मी मानतो आणि बदलाशी जुळवून घेणे आवश्यक आहे. बदल कोणताही असला तरी तो सकारात्मकपणे घेतला पाहिजे, असं सुनील म्हणाला.

“पुन्हा एकदा झी मराठीसोबत काम”

झी मराठीवर काम करण्याची उत्सुकता नेहमीच होती. कारण झी मराठी मालिका विश्वात अग्रेसर आहे. मी झी मराठी बरोबर एकदिलाने 2012 पर्यंत काम केलंय. त्यामुळे एक आत्मीयता आहे, जशी दूरदर्शन केंद्रबद्दल आहे. जेव्हा पासून प्रायव्हेट चॅनेलची सुरुवात झाली. तेव्हा पासून झी मराठीने अनेक कलाकारांच्या करियरला आकार देण्यास मदत केली आहे. तेव्हा पुन्हा झी मराठी सोबत काम करण्याची उत्सुकता वेगळीच आहे, असं सुनील बर्वे म्हणाला.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.