लैंगिक छळ प्रकरणात प्रसिद्ध अभिनेत्याला तब्बल 5 वर्षांनंतर दिलासा, पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता
सर्वांसमोर 30 वर्षीय महिलेचा लैंगिक छळ प्रकरण... प्रसिद्ध अभिनेत्याला तब्बल 5 वर्षींनंतर दिलासा, महिलेने केलेल्या गंभीर आरोपांनंतर अभिनेत्याने भोगला तुरुंगवास, पण..., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा

अभिनेता विजय राज याला लैंगिक छळ प्रकरणात तब्बल 5 वर्षांनंतर दिलासा मिळाला आहे. सबळ पुरावे नसल्यामुळे अभिनेत्याची निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती समोर येत आहे. गुरुवारी, 15 मे रोजी महाराष्ट्र न्यायालयाने या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी झाल्यानंतर विजय राजला निर्दोष मुक्त केलं 2021 मध्ये, त्याच्या एका सहकाऱ्याने त्याच्याविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल केला होता. आता या आरोपांमधून अभिनेत्याची सुटका झाली आहे.
संबंधित प्रकरणाबद्दल सांगायचं झालं तर, 2020 मध्ये ‘शेरनी’ सिनेमाच्या शुटिंग दरम्यान विजय राज याच्यावर छेडछाडीचा आरोप लावण्यात आला होता. क्रू मेंबरमधल्या 30 वर्षीय युवतीची छेड काढल्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल करून विजय राजला अटक (Arrested) करण्यात आली गोंदियातील रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ही घटना 25 ऑक्टोबर 2020 च्या रात्री ते 29 ऑक्टोबर 2020 च्या सकाळच्या दरम्यान घडली. तेव्हा अभिनेता आणि संपूर्ण टीम मध्य प्रदेशातील बालाघाट येथील एका हॉटेलमध्ये थांबली होती.
महिलीने अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर विजय राज याला 4 नोव्हेंबर 2020 मध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर अभिनेत्याची जामीनावर सुटका झाली. घटना घटल्यानंतर टीममधील एका व्यक्तीने संबंधित घटनेवर स्पष्टीकरण दिलं होतं. ‘सेटवर तेव्हा 30 लोकं होती आणि सर्वांच्या समोर ही घटना घडली. विजय राज याने महिलेला पकडून खेचलं होतं. त्यामुळे महिला प्रचंड संतापली होती.’

विजय राज
कोर्टाकडून अभिनेता विजय राज याची निर्दोष मुक्तता
याप्रकरणी निकाल देताना न्यायालयाने सांगितलं, तपास अधिकाऱ्याने पुढील कोणताही तपास केला नाही. त्यामुळे सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे कमकुवत आणि अपुरे वाटतात. जप्त केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही आरोपींनी केलेला कथित छळ स्पष्टपणे दिसून येत नाही.
न्यायालयाने असं देखील म्हटलं आहे की, आरोपीचा गुन्हा निर्णायकपणे सिद्ध करण्यात सरकारी वकिलांना अपयश आलं आहे. या आधारावर विजय राज याला निर्दोष मुक्त करण्यात आलं.
विजय राज याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. ‘रन’, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘धमाल’, ‘सनम तेरी कसम’, ‘ड्रीम गर्ल’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं आहे.
