विराट कोहली फोटो लाईकचा किस्सा, अवनीत कौर म्हणाली, ‘प्रेम मिळतं…’
Avneet Kaur Reacts on Virat Kohli: अवनीत कौरचा एक फोटो लाईक करणं विराटला पडलेलं महागात..., लाईकचा 'तो' किस्सा..., अखेर अवनीत कौर म्हणाली, 'प्रेम मिळतं...', सध्या सर्वत्र अवनीत हिच्या वक्तव्याची चर्चा

Avneet Kaur Reacts on Virat Kohli: सोशल मीडीयावर सेलिब्रिटींनी कोणत्याही पोस्टवर एक लाईक केलं तरी चर्चांना उधाण येतं. काही दिवसांपूर्वी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली याने टीव्ही अभिनेत्री अवनीत कौर हिचा एक फोटो लाईक केलेला. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं.. पण याचा फायदा अवनीत हिला मोठ्या प्रमाणात झाला. एका रात्रीत सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या संख्येत मोठी वाढ देखील झाली. आता नुकताच अवनीत हिने नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात विराट कोहली फोटो लाईकच्या प्रकरणावर मोठं वक्तव्य केलं आहे.
सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरने विराट कोहलीच्या फोटोला लाईक केल्याच्या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. आयपीएल 2025 दरम्यान, एप्रिलमध्ये तिच्या एका पोस्टवर कोहलीने लाईक केलं होतं. फोटोमध्ये अवनीत कौर हिने क्रॉप टॉप आणि मिनी स्कर्ट घातलं होतं…
सांगायचं झालं तर, विराट कोहली याच्या इन्स्टाग्रामवर 270 मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. म्हणून सोशल मीडियावर होणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांचं बारीक लक्ष असतं. विराट याने अवनीत हिचा फोटो लाईक करून लगेच डिसलाईक पण तरी देखील त्याचे स्क्रिनशॉट्स सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
यावर अनेक दिवसांनंतर अवनीत हिने मौन सोडलं आहे. अवनीत सध्या ‘लन्ह इन वियतनाम’ सिनेमात व्यस्त आहे. सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान अवनीत हिला, ‘मोठ्या सेलिब्रिटींकडून कौतुक होत आहे…’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अवनीत म्हणाली, ‘असचं प्रेम कायम मिळत राहो… यापुढे आणखी काय बोलू शकते…’ असं अवनीत म्हणाली. सध्या सर्वत्र अवनीत हिची चर्चा रंगली आहे.
फोटो लाईकचा किस्सा चर्चेत आल्यानंतर विराट कोहली याने स्पष्टीकरण देखील दिलं होतं. मी हे स्पष्टीकरण देऊ इच्छितो की, मी जाणीवपूर्वक त्या फोटोला लाईक केलं नाही. जे काही घडलं ते चुकून झालं होतं. यासाठी मी सर्वांना विनंती करतोी याबाबत कोणताही गैरसमज पसरवू नका. मला समजून घेण्याबाबत सर्वांचे धन्यवाद.’
अवनीत कौर हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने लहानपणीच झगमगत्या विश्वात पदार्पण केलं. आता अवनीत बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. सोशल मीडियावर अवनीत कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
