घटस्फोटानंतर एक्स पतीसोबत रोमांटिक होताना दिसली ‘ही’ अभिनेत्री, अगोदर गंभीर आरोप आणि थेट…
अभिनेत्री चारू असोपा हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. चारू असोपाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. चारू असोपा आणि राजीव सेन यांनी काही दिवसांपूर्वीच घटस्फोट घेतला. मात्र, आता त्यांचे व्हायरल होणारे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसलाय.

अभिनेत्री चारू असोपा हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. चारू असोपाची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. चारू असोपा हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. चारू असोपा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या आयुष्याचे प्रत्येक अपडेट आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना व्लॉगच्या माध्यमातून चारू असोपा ही दिसते. काही दिवसांपूर्वीच चारू असोपा हिने पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले. हेच नाही तर काही दिवसांपूर्वीच चारू असोपा हिचा घटस्फोट झालाय. मात्र, आता चारू असोपा हिचे व्हायरल होणारे फोटो पाहून चाहत्यांना मोठा धक्का बसला.
चारू असोपा हिने काही वर्ष डेट केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिचा भाऊ राजीव सेन याच्यासोबत लग्न केले. चारू असोपा आणि राजीव सेन यांची एक मुलगी देखील आहे. मात्र, लेकीच्या जन्मानंतरच चारू असोपाने पतीवर गंभीर आरोप करत म्हटले की, राजीव सेन याचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यावरून दोघांमध्ये मोठा वाद देखील झाला.
हेच नाही तर चारू असोपा हिच्यावरही एका अभिनेत्यासोबत अफेअर सुरू असल्याचा आरोप राजीव सेन याच्याकडून करण्यात आला. चारू असोपा आणि राजीव सेन यांच्यातील वाद हा चांगलाच टोकाला गेल्याचे बघायला मिळाले. मात्र, आता परत ते एकमेकांसोबत स्पॉट होताना हे दोघे कायमच दिसत आहेत.
हेच नाही तर चारू असोपा आणि राजीव सेन हे विदेशात खास वेळ घालवताना देखील दिसले. चारू असोपा आणि राजीव सेन यांचे विदेशातील फोटोही व्हायरल होताना दिसले. चारू असोपा हिने आणि राजी सेन यांनी म्हटले की, आम्ही आमच्या मुलीला आई वडिलांचे एकत्र प्रेम देण्यासाठी तिला विदेशात घेऊन गेलो होते.
आता चारू असोपा हिने राजीव सेनच्या बर्थडेला खास फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले आहेत. इंस्टा स्टोरीवर तिने फोटो शेअर केले आहेत. चारू असोपा ही राजीव सेन याच्यासोबत खास वेळ घालवताना दिसत आहे. चारू असोपा हिने शेअर केलेल्या या फोटोंनंतर ती नेटकऱ्यांच्या निशाणावर आल्याचे बघायला मिळतंय. अनेकांनी म्हटले की, काही दिवसांपूर्वीच गंभीर आरोप तुम्ही करत होतात आणि आता एकत्र फिरत आहेत. फोटोंमध्ये एक्स पतीसोबत रोमांटिक होताना चारू असोपा दिसत आहे.
