AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्रीने असं काय केलं ज्यामुळे आई म्हणाली, अशी लेक नसलेली बरी…

Actress Life: अशी लेक नसलेली बरी..., आईच्या तोंडून असे शब्द ऐकताच कोलमडली अभिनेत्री, तिने 32 व्या वर्षी असं केलं तरी काय होतं? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या वकत्तव्याची चर्चा...

वयाच्या 32 व्या वर्षी अभिनेत्रीने असं काय केलं ज्यामुळे आई म्हणाली, अशी लेक नसलेली बरी...
फाईल फोटो
| Updated on: Jul 24, 2025 | 2:45 PM
Share

Actress Life: अनेक अभिनेत्री आहे ज्यांनी सिनेमाची गरज म्हणून बोल्ड आणि इंटिमेट सीन दिले आहे. सर्व टीमसमोर असे सीन शूट करणं फार कठीण असतं. पण पूर्ण काळजीपूर्वक इंटिमेट सीन शूट केले जातात. पण अनेकदा हेच सीन अभिनेत्रींसाठी धोक्याची घंटा ठरतात. समाज आणि कुटुंबियांकडून देखील अभिनेत्रींवर टीका केली जाते. यामुळे जवळच्या नात्याला देखील तडा जाते. असंच काही 32 वर्षीय अभिनेत्रीसोबत झालं आहे. तेव्हा ‘अशी मुलगी नसलेली बरी…’ असं वक्तव्य अभिनेत्रीच्या आईने केलं होतं.

2019मध्ये ‘आय लव्ह यू’ नावाचा एक सिनेमा प्रदर्शित झाला. हा एक कन्नड सिनेमा आहे, ज्यामध्ये अभिनेत्री रचिता राम मुख्य भूमिकेत होती. या सिनेमात तिच्यासोबत अभिनेता उपेंद्र मुख्य भूमिकेत होता. सिनेमाला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. पण सिनेमा अभिनेत्रीच्या आई – वडिलांना आवडला नव्हता.

सिनेमाच्या कथेची गरज म्हणून अभिनेत्रीला एक बोल्ड सीन द्यावा लागला. पण मुलीने मोठ्या पडद्यावर केलेलं काम अभिनेत्रीत्या आई – वडिलांना बिलकूल आवडलं नाही. सिनेमानंतर रचिताने तिच्या आयुष्यात आलेल्या मोठ्या बदलांबद्दल सांगितलं.

सीन पााहिल्यानंतर अभिनेत्री आई तिला म्हणाली, ‘एक अभिनेत्री म्हणून तुझ्या कामाचा मी स्वीकार करेल. पण एक मुलगी म्हणून कधीच तुझ्या कामाचा स्वीकार करणार नाही.’ आईचे हे शब्द ऐकल्यानंतर अभिनेत्रीने लगेच आई – वडिलांची माफी मागितली.

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘माझ्यासाठी माझं कुटुंब सर्वकाही आहे. कुटुंबानंतर जे काही असेल ते असेल… माझ्या आई – वडिलांसाठी मी एक चांगली मुलगी आहे आणि जे माझ्याकडून झालं आहे, त्यासाठी मला प्रचंड वाईट वाटत आहे… हे मी कुटुंबियांसमोर सांगू शकत नाही. मी स्वतःला एक मुलगा समजते.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली होती.

रचिता हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, 2013 मध्ये अभिनेत्रीने अभिनय विश्वात पदार्पण केलं. आता ती कन्नड विश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील मोठी आहे.

शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.