
बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने मोठा काळ चित्रपटांमध्ये घालवला आहे. अभिनेत्री तिच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. अभिनेत्रीने 2007 मध्ये अभिषेक बच्चन याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर सलमान खानला डेट केले. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांची लव्ह स्टोरी कायमच चर्चेत राहिलेली आहे. मात्र, एका वाईट वळणावर त्यांचे रस्ते वेगळे झाले. सलमान खानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या अभिषेकसोबत लग्न केले. मात्र, सलमान खान अजूनही लग्न केले नाही. यादरम्यानच ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाबद्दल विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. दोघांचा घटस्फोट होणार असल्याचे सातत्याने सांगितले जाते. ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या नात्याबद्दल एक अभिनेत्रीने मोठा खुलासा केला. हेच नाही तर सलमान खान ऐश्वर्यासाठी नेमके काय करत हे देखील सांगितले.
ऐश्वर्या राय हिने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक बॉलिवूडच्या हीट चित्रपटांमध्ये काम केले. अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांच्यासोबत ऐश्वर्याने उमराव जान, हमारा दिल आपके पास है, आ अब लाैट चले या चित्रपटांमध्ये काम केले. एका मुलाखतीमध्ये सलमान खान आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल हिमानी शिवपुरी यांनी मोठा खुलासा केला. ऐश्वर्या राय कशी आहे आणि तिचा स्वभाव कसा आहे, यावरही त्यांनी भाष्य केले.
ज्यावेळी हैद्राबादमध्ये त्यांच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्यावेळी सलमान खान आणि ऐश्वर्यामध्ये नेमके काय घडले हे त्यांनी सांगितले. मानी शिवपुरी यांनी म्हटलेले की, मी स्वत: ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांना एकत्र वेळ घालवताना बघितले आहे. ज्यावेळी आमच्या चित्रपटाचे हैद्राबादमध्ये शूटिंग सुरू होते, त्यावेळी सलमान खान हा रात्री उशीरा ऐश्वर्या राय हिला भेटण्यासाठी दररोज येत आणि रात्रभर थांबून सकाळी लवकर जात.
मला आठवते की, एकदा आमच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू होते, त्यावेळी सलमान खान रागात सेटवर आला आणि मला म्हणाला की, तिला सांगा ती खूप काही सुंदर नाहीये. यावेळी मी सलमान खानला शांत होण्यास सांगितले. यानंतर अभिनेत्रीने सलमान आणि ऐश्वर्या राय यांच्या ब्रेकअपवर भाष्य करणे टाळले.