ऑनस्क्रीन बहिणी, ऑफस्क्रीन मात्र दुश्मनी, श्रीदेवीशी न बोलल्याची खंत वाटते, जया प्रदांनी सांगितला किस्सा!

Harshada Bhirvandekar

| Edited By: |

Updated on: Apr 22, 2021 | 10:50 AM

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’च्या या आठवड्याच्या विशेष भागात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा (Actress Jaya Prada) यांनी हजेरी लावली होती.

ऑनस्क्रीन बहिणी, ऑफस्क्रीन मात्र दुश्मनी, श्रीदेवीशी न बोलल्याची खंत वाटते, जया प्रदांनी सांगितला किस्सा!
जया प्रदा आणि श्रीदेवी
Follow us

मुंबई : छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडॉल 12’च्या या आठवड्याच्या विशेष भागात बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया प्रदा (Actress Jaya Prada) यांनी हजेरी लावली होती. जया प्रदा यांच्या समोर शोचे स्पर्धक एकापेक्षा एक करून उत्कृष्ट सादरीकरण करताना दिसतील. या कार्यक्रमाच्या विशेष भागात जया प्रदा यांची गाणी या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. त्याचवेळी जया प्रदा देखील त्यांच्या चित्रपट कारकिर्दीतील अनेक किस्से शेअर करणार आहेत. जे बहुधा कोणाला ठाऊक नसतील (Actress Jaya Prada share the behind story why she never talks with sridevi).

यावेळी जया प्रदा त्यांच्या श्रीदेवीबरोबर कित्येक वर्षे चाललेल्या ऑफ स्क्रीन दुश्मनीबद्दलही सांगणार आहेत. दोघीही एकत्र मोठ्या पडद्यावर बहिणींची भूमिका साकारत असत. या दोघांची पडद्यावरची केमिस्ट्री चांगलीच गाजली होती. पाहणाऱ्या प्रत्येकाला जणू काही या खऱ्या बहिणी असेच वाटे, पण प्रत्यक्षात तसे नव्हते. दोघींनी सेटवर एकमेकींशी बोलणेसुद्धा आवडायचे नाही, याचा खुलासा स्वतः जया प्रदा यांनी ‘इंडियन आयडल 12’च्या सेटवर केला. तसेच, अभिनेते जितेंद्र आणि राजेश खन्ना या दोघांनाही दोघींमधले वैर मिटवण्यासाठी कसे प्रयत्न केले ते देखील सांगितले.

जया आणि श्रीदेवी एकमेकींकडे पाहतही नव्हत्या!

जया प्रदा म्हणाल्या, ‘मी म्हणू शकतो की, मी एक अतिशय भाग्यवान व्यक्ती आहे. आमच्यात (जया प्रदा आणि श्रीदेवी) कोणत्याही वैयक्तिक तक्रारी नव्हत्या, पण आमची केमिस्ट्री कधीच मॅच झाली नाही. पडद्यावर दोन चांगल्या बहिणींची भूमिका करत असूनही, आम्ही दोघींनीही कधीही एकमेकींकडे कधीही पाहिले देखील नाही. नृत्यापासून ते ड्रेसपर्यंत आम्ही दोघेही एकमेकांशी स्पर्धा करायचो. जेव्हा जेव्हा दिग्दर्शक आम्हाला सेटवर एकमेकिंची ओळख करून देत असत, तेव्हा आम्ही एकमेकिंना भेटायचो आणि आपापल्या कामावर परतायचो.’(Actress Jaya Prada share the behind story why she never talks with sridevi)

जितेंद्र आणि राजेश खन्नांनी केले अथक प्रयत्न

श्रीदेवी आणि जया यांच्यात बोलणी करून देण्याचा प्रयत्न सुरु असतानाचा एक किस्सा शेअर करताना जया प्रदा म्हणाल्या, ‘मला आठवतंय ‘मकसद’ या या चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी जीतू जी अर्थात जितेंद्र आणि राजेश खन्ना (राजेश खन्ना) यांनी आम्हाला काही तास मेकअप रूममध्ये बंद केले होते. त्यांना वाटले की, जर या दोघी एका खोलीत बंद असतील, तर त्या एकमेकांशी बोलू लागतील. परंतु, आम्ही दोघीही एकमेकींशी एक शब्दही बोलू शकलो नाही. यानंतर बॉलिवूडच्या दोन्ही सुपरस्टार्सनी आमच्यात सलोखा निर्माण करण्याचे प्रयत्न सोडून दिले.’

श्रीदेवीशी न बोलल्याची खंत वाटते!

अभिनेत्री जया प्रदा यांना आजही श्रीदेवीशी बोलू न शकल्याची खंत वाटते. श्रीदेवीच्या मृत्यूची बातमी जेव्हा त्यांना मिळाली, तेव्हा जया प्रदाला यांना जुने दिवस आठवले. जया प्रदा म्हणाल्या, ‘जेव्हा मला कळले की त्या आपल्याला सोडून गेल्या, तेव्हा मला फार वाईट वाटले. आजही त्यामुळे मला दु:ख होते आणि मला तिची खूप आठवण येते, कारण आता मला एकटे-एकटे वाटते. मी हे देखील सांगू वाटते की, जर ती आता कुठूनही माझे बोलणे ऐकत असेल, तर मला तिला इतकेच सांगायचे आहे की, कदाचित आपण दोघी एकमेकींशी आता बोलू शकलो असतो…’ हे किस्से शेअर करत असताना अभिनेत्री जया प्रदा भावूक झालेल्या दिसल्या.

(Actress Jaya Prada share the behind story why she never talks with sridevi)

हेही वाचा :

PHOTO | ‘बिग बॉस’ फेम रश्मी देसाईने बेडरूममध्ये केले हॉट फोटोशूट, अदा पाहून चाहते झाले घायाळ!

Radhe | ‘भाई का कमिटमेंट, ईद पर एंटरटेनमेंट’, थिएटर आणि ओटीटीवर एकाच दिवशी प्रदर्शित होणार सलमानचा चित्रपट!

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI