AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rakul Preet Singh : IT रेड्सच्या चर्चेवर रकुल प्रीत सिंह संतापली; म्हणाली, “माझ्याशी काहीही संबंध नाही”

Rakul Preet Singh On IT Raid : अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने तिच्यावरील आयटी रेडच्या चर्चांवर मौन सोडले आहे. तिने एक लांबलचक पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिलं आहे.

Rakul Preet Singh : IT रेड्सच्या चर्चेवर रकुल प्रीत सिंह संतापली; म्हणाली, “माझ्याशी काहीही संबंध नाही”
| Updated on: Oct 05, 2026 | 3:41 PM
Share

काही दिवसांपूर्वी प्रोड्यूसर वासू भगनानी, जॅकी भगनानी, अभिनेत्री रकुल प्रीत सिंह आणि पॅनोरमा स्टुडिओजच्या अनेक ठिकाणांवर आयटीने छापा टाकल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे मोठी खळबळ माजली. मात्र आता काही दिवसांनी अभिनेत्री रकुल प्रीत सिंह (Rakul Preet Singh) हिने याविषयावर मौन सोडलं असून एक स्टेटमेंट जारी केलं आहे. इन्कम टॅक्स रेड्सशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा तिने केला आहे. माझ्याशीर संबंधित कोणत्याही ठिकाणांवर एकही रेड पडलेली नाही. छापा टाकण्यात आल्याच्या या बातम्या म्हणजे निव्वळ अफवा असल्याचे सांगत तिने यावरून नाराजी व्यक्त केली. ती चांगलीच संतापलेली दिसली. तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवर रकुलने एक पोस्ट लिहीली असून या सर्च ॉपरेशनशी आपला दुरान्वये काहीही संबंध नसल्याचे तिने अगदी स्पष्ट शब्दांत मांडलं आहे.

काय म्हणाली रकुल प्रीत ?

अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने तिच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर आणि रिपोर्ट्सवर स्पष्टीकरण दिलं आहे. आपल्या वक्तव्यात तिने स्पष्ट केलं की, “हे सर्च ऑपरेशन माझ्याशी संबंधित नव्हतं.” रकुलने पुढे म्हटलं, “सगळ्यांना माहीत असेल, की मी आर्मी बॅकग्राऊंडमधून येते आणि या इंडस्ट्रीत माझ्या मागे कोणताही गॉडफादर नव्हता. मी केवळ माझ्या मेहनतीच्या जोरावर स्वतःची ओळख निर्माण केली आहे. एक जबाबदार आणि कायद्याचं पालन करणारी नागरिक म्हणून मी वयाच्या 20व्या वर्षापासून नियमितपणे माझे संपूर्ण कर भरत आले आहे.” असं तिने नमूद केलं.

माझ्याकडे कोणतीही बेनामी मालमत्ता नाही

अलीकडे समोर आलेल्या विविध रिपोर्ट्सचं खंडन करत रकुलने परदेशातील कथित बेकायदेशीर व्यवहारांबाबतही स्पष्टीकरण दिलं. तिने सांगितलं की, ती वैयक्तिकरित्या किंवा कोणत्याही प्रॉडक्शन हाऊसच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर परदेशी व्यवहारात सहभागी नाही. “देशात किंवा परदेशात माझ्या नावावर कोणतीही बेनामी मालमत्ता नाही. मला कधीही कुणी मालमत्ता भेट म्हणून दिलेली नाही आणि माझ्या तत्त्वांनुसार मी अशा महागड्या भेटवस्तू स्वीकारतही नाही” असंही तिने पुढे स्पष्ट केलं.

View this post on Instagram

A post shared by Rakul Singh (@rakulpreet)

रकुलचं काम

रकुल प्रीत सिंग ही शेवटची वेळी आयुष्मान खुरानाच्या ‘पति पत्नी और वो दो’ मध्ये दिसली होती. ह्या चित्रपटात सारा अली खान आणि वामिका गब्बीसुद्धा होत्या. यापूर्वी ती मागील वर्षी अजय देवगणसोबत ‘दे दे प्यार दे 2’ मध्ये दिसली होती. येणाऱ्या काळात ती रणबीर कपूरच्या ‘रामायण’ मध्ये दिसणार आहे. ह्या चित्रपटात ती रावणाची बहीण शूर्पणखा याची भूमिका साकारताना दिसेल.

Follow Us
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा...
खाटूश्याम दर्शनाहून परतताना काळाचा घाला! धुळ्यातील 9 भाविकांचा राजस्थानमध्ये भीषण अपघात
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद...
मुंबईत हुडहुडी! 11 वर्षांतील नोव्हेंबरमधील नीचांकी तापमानाची नोंद, प्रदूषणातही वाढ
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो.
मुंबईच्या रस्त्यांवर धावपटूंचा उत्साह! WNC नेव्ही हाफ मॅरेथॉनला शेकडो धावपटूंचा प्रतिसाद
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच...
मंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच भाजपच्या माजी आमदारांना व्यासपीठावरच लागली डुलकी; VIDEO व्हायरल!
मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? अहिर म्हणाले?
Sachin Ahir : मुंबई जिल्हा बँकेत शिवसेना अतिरिक्त एका जागेसाठी आग्रही? सचिन अहिर काय म्हणाले?
मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा...
Deven Bharati : डायल 112 पासून GPS ट्रॅकिंगपर्यंत…; मविआच्या कार्यकाळात पोलिसांच्या सुविधा मागे पडल्याचा देवेन भारतींचा दावा
चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
Dharashiv Farmer : चारा नसलेल्याने जनावरे डोंगरात सोडून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे
Pune : बाभळीच्या काट्यांच्या ढिगाऱ्यात भाविकांच्या उड्या; पुरंदरमधील गुळुंचे गावची अनोखी काटेबारस यात्रा, व्हिडिओ बघाच
एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर चंदनशिवे स्पष्टच बोलले
Nitin ChandanShive : एकजूट नसल्यामुळेच यश...; EVM हटावच्या मागणीवर नितीन चंदनशिवे स्पष्टच बोलले
माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान
Narhari Zirwal on Sharad Pawar : माझ्याबाबत पवारांच्या मनात संशयाचं...; नरहरी झिरवाळांचं मोठं विधान