‘रुममध्ये अचानक कापराचा वास…’ अभिनेत्री शेफालीचा आत्मा अजूनही घरात वावरतो; पती पराग त्यागीने सांगितला अनुभव
अभिनेत्री शेफाली जरीवालाच्या निधनानंतर पती पराग त्यागीना अजूनही तिचा भास होतो. परागने त्याला घरात आलेला अनुभव सांगत घरात अजूनही शेफालीचा आत्मा आहे असा दवा त्याने केला आहे. घरात त्याच्यासोबत अशा काही घटना घडल्या आहेत की त्याला शेफालीची उपस्थिती स्पष्टपणे जाणवते.

अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. 27 जून 2025 रोजी वयाच्या 42 व्या वर्षी तिचे निधन झाले. पण तिचा नवरा पराग त्यागी अजूनही तिला विसरू शकत नाही. तो बऱ्याचदा तिच्या आठवणीत पोस्ट शेअर करताना दिसतो. अलिकडेच त्याने शेफालीचा टॅटूही काढला होता. यावेळी पराग त्यागीने असा अनुभव शेअर केला आहे. ज्यामुळे चाहत्यांना विचार करायला भाग पाडलं आहे. परागने सांगितले आहे की त्याला घरात अजूनही शेफालीचा आत्म्याचा आभास होतो. त्याला असे अनेक अनुभव आले आहेत की त्यामुळे त्याला हे स्पष्टपणे जाणवते की शेफाली त्याच्या आसपासच आहे.
परागने खुलासा केला की त्याला असे काहीतरी जाणवले जे केवळ त्याच्या हृदयालाच नव्हे तर त्याच्या आत्म्यालाही स्पर्शून गेले. तो म्हणाला की त्याला अजूनही शेफालीची उपस्थिती जाणवते, जणू ती कुठेतरी जवळ आहे, फक्त अदृश्य आहे.
View this post on Instagram
घरात शेफालीचा आत्मा असल्याची जाणीव
शेफाली जरीवाला यांच्या निधनानंतर पराग निराश झाला होता. त्यांनी त्यांच्या एकाकीपणावर मात करण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. गेल्या तीन महिन्यांपासून पराग त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर अभिनेत्रीच्या आठवणी सतत शेअर करत आहेत. अलीकडेच, त्याने त्याच्यासोबत घडलेली एक घटना सांगितली. त्यांच्या पॉडकास्ट चॅनेलवर, अभिनेत्याने स्पष्ट केले की त्याची एक दिनचर्या आहे. तो दररोज सकाळी उठल्यावर प्रार्थना आणि ध्यान करतो आणि संध्याकाळी घरी दिवा लावतो.
अचानर कापूर जळत आहे असा सुगंध अचानक येऊ लागला अन्
तो म्हणाला, “मी दिवा लावला आणि घरात सर्वत्र शेफालीचे फोटो आहेत. त्यांना पाहून मी रडू लागलो. मी खूप रडत होतो आणि म्हणालो, ‘बाबू, तू मला का सोडून गेलीस, माझ्या मैत्रिणी?’ मग, मला अचानक कापरचा वास येऊ लागला.” त्याच्या समोर कापूर जळत असल्यासारखं त्याला वाटले. तसेच त्याच्या मते शेफालीला कापूर घरात लावणे खूप आवडत असे. तो पुढे म्हणाला, “मी त्याचा सुगंध कुठून येत आहे हे पाहण्यासाठी उठलो पण कुठेही कापूर जळत नव्हता.. शेवटी मी हसून म्हणालो, “बाबू, तू माझ्या शेजारीच आहे ना?” पराग पुढे म्हणाला की हे बोलताच त्याला डोक्यापासून पायापर्यंत एक तीव्र ऊर्जा जाणवली. त्याचे केस उडत असल्याचे त्याला जाणवले आणि त्याला मिठी मारल्यासारखे वाटले. तो म्हणतो की तो त्या अनुभवाचे शब्दात वर्णन करू शकत नाही. दरम्यान त्याने असंही म्हटलं की हा सर्व अनुभ भयावह नव्हता, तर खूप दिलासा देणारा होता. जणू कोणीतरी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला होता.
