लग्न कधी होणार? प्रश्नावर श्रद्धा कपूर म्हणाली…

अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूरसोबत दिल्लीत तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे.

लग्न कधी होणार? प्रश्नावर श्रद्धा कपूर म्हणाली...

मुंबई : अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) गेल्या काही दिवसांपासून रणबीर कपूरसोबत दिल्लीत तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. बुधवारी श्रद्धा चित्रपटाचे शूटिंग संपवून मुंबईत परतली आहे. विमानतळावर श्रद्धा अतिशय स्टाइलिश लूकमध्ये दिसली. विमानतळावरून बाहेर येत असताना पैपराजीने फोटो घेत असताना श्रद्धाला लग्नाच्या चर्चेविषयी प्रश्न विचारला त्यावेळी श्रद्धा अतिशय प्रेमाने उत्तर देत म्हणाली की, काय म्हणतो…आणि श्रद्धा तेथून हसत हसत निघून गेली. (actress Shraddha Kapoor is asked about marriage, she says)

यावेळी श्रद्धाने व्हाइट कलरचा शर्ट, गुलाबी पँट आणि ब्लॅक जॅकेट घातले होते. गेल्या बऱ्याच दिवसांपासून श्रद्धाचे आणि रोहन श्रेष्ठाचे नाव सोडले जात आहे. श्रद्धा लवकरच लग्न करणार असल्याच्याही बातम्या सर्वत्र आहेत. श्रद्धा आणि रोहनच्या डेटिंगच्या बातम्या बर्‍याच काळापासून येत आहेत, पण अद्याप दोघांनीही त्यांचे नाते स्वीकारलेले नाही. रोहन एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे आणि सेलिब्रिटींचे फोटो काढतो.

शक्ती कपूरला जेव्हा श्रद्धाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारले गेले तेव्हा ते म्हणाले होते की, ‘श्रद्धाच्या लग्नाविषयी ज्या काही गोष्टी ऐकायला मिळत आहेत, त्या फक्त अफवाच आहेत. पुढच्या 4-5 वर्षांनंतर श्रद्धा लग्नाचा विचार करू शकते. सध्या तिच्याकडे बरेच मोठे चित्रपट आहेत आणि तिला तिचे लक्ष या चित्रपटांवर केंद्रित करायचे आहे. शक्ती कपूर श्रद्धाच्या बॉयफ्रेंडबद्दल म्हटले होते की, रोहन एक चांगला मुलगा आहे. तो लहानपणापासूनच आमच्या घरी येत राहतो. श्रद्धाने मला त्यांच्या लग्नाविषयी काहीही सांगितले नाही. आणि ते दोघांही खूप चांगले मित्र आहेत.

संबंधित बातम्या :

Big News | चाहत्यांची प्रतीक्षा संपली, अक्षय कुमारचा सूर्यवंशी ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित?

Urmila Matondkar B’day | उर्मिला मातोंडकरच्या करिअरवर जेव्हा राम गोपाल वर्मामुळे टाच आली

अभिनेता संजय दत्तकडून पत्नीला 100 कोटींचे 4 फ्लॅट्स गिफ्ट, मात्र मान्यताकडून आठवडाभरात रिटर्न

(actress Shraddha Kapoor is asked about marriage, she says)

Published On - 12:36 pm, Thu, 4 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI