24 वर्षात 3 मुलं, अभिनेत्री तरी म्हणते अजूनही मी… लेकरांसोबत न राहण्याचं कारणही सांगितलं!
एका अभिनेत्रीने वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी तीन मुलांची आई झाली आहे. पण ती या तीन मुलांसोबत राहात नाही. त्यामगाचे कारण देखील अभिनेत्रीने सांगितले आहे. आता नेमकं कारण काय चला जाणून घेऊया...

अभिनेत्री या कायमच त्यांच्या चित्रपटांमधील भूमिकांसोबतच खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. एक अभिनेत्री अशी आहे जी वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी तीन मुलांची आई बनली आहे. अभिनेत्रीच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता अभिनेत्रीने मुलांच्या संगोपनाबाबत मोठा खुलासा केला आहे. तसेच ती मुलांसोबत राहत नसल्याने अभिनेत्रीने एका मुलाखतीमध्ये सांगितले आहे. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. चला जाणून घेऊया…
आम्ही ज्या अभिनेत्रीविषयी बोलत आहोत ती तेलुगु आणि कन्नड सिनेमात काम करणारी श्रीलीला आहे. तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल असा खुलासा केला आहे, ज्याने सर्वांनाच विचार करायला भाग पाडले आहे. फक्त २४ वर्षांच्या वयात तिने तीन मुलांना दत्तक घेतले आहे. श्रीलीलाने स्पष्ट केले आहे की त्या स्वतःला ‘पूर्णपणे आई’ मानत नाहीत, पण मुलांची जबाबदारी आणि त्यांची काळजी घेण्याबाबत पूर्णपणे सजग आहेत. श्रीलीला एक नव्हे तर ३-३ मुलांना दत्तक घेतले आहे, ज्यांची ती काळजी घेते. नुकताच तिने दिलेल्या एका मुलाखतीत चित्रपट कारकीर्द आणि तीन मुलांची काळजी घेण्याबाबत वक्तव्य केले.
‘मी घाबरते’
मुलाखतीत श्रीलीलाला तिच्या चित्रपट कारकीर्द आणि तीन मुलांची काळजी घेण्यामधील संतुलनाबद्दल विचारण्यात आले होते. तेव्ही ती म्हणाली, ‘या विषयावर बोलताना मला अनेकदा शब्द कमी पडतात आणि मी घाबरते. पण त्यांची काळजी घेण्याची पूर्ण व्यवस्था आहे. मी एक ‘आई’ नाही, कारण यामागे एक वेगळीच कहाणी आहे.’
२०२२ मध्ये दोन मुलांना घेतले दत्तक
श्रीलीलाने सांगितले की हा प्रवास तिचा पहिल्या कन्नड चित्रपट ‘किस’ (२०१९) दरम्यान सुरू झाला, जेव्हा दिग्दर्शक तिला एका आश्रमात घेऊन गेला. तिने २०२२ मध्ये, फक्त २१ वर्षांच्या वयात, आश्रमातून दोन दिव्यांग मुले गुरू आणि शोभिता यांना दत्तक घेतले. गेल्या वर्षी तिने एका लहान मुलीला देखील दत्तक घेतले. श्रीलीलाने सांगितले की मुले आश्रमातच राहतात, त्या त्यांच्याशी फोनवर बोलतात आणि त्यांना भेटायला जात राहतात.
‘मी आईसारखी आई नाही’
अभिनेत्रीने हेही सांगितले की ही बाब बराच काळ गुप्त राहिली, पण संस्थेने त्यांना ती सार्वजनिक करण्यास सांगितले जेणेकरून इतर लोक प्रेरित होतील. त्यांचे म्हणणे होते, ‘मी कोणतेही क्रेडिट घेण्यास इच्छुक नाही, फक्त इच्छा आहे की लोक या दिशेने विचार करायला सुरुवात करतील.’ श्रीलीलाने हेही सांगितले की मुलांनी तिच्यासोबत राहावे अशी इच्छा आहे, पण सध्या तसे करणे शक्य नाही. ‘जेव्हा या विषयावर बोलते तेव्हा शब्द कमी पडतात आणि थोडे घाबरायला होते. पण सर्व काही संभाळलेले आहे. मी आईसारखी आई नाही कारण यामागे पूर्णपणे वेगळी कहाणी आहे.’
