Vastu Shastra : सूर्यास्तानंतर या चूक टाळा, अन्यथा घरात गरीबी आलीच म्हणून समजा
वास्तुशास्त्रानुसार अशा काही गोष्टी आहेत, ज्या सांयकाळच्या वेळी सूर्यास्तानंतर करणं अशुभ मानलं गेलं आहे. अशा गोष्टी तुम्ही जर सूर्यास्तानंतर करत असाल तर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो. परिणामी तुम्हाला आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो. जाणून घेऊयात वास्तुशास्त्र नेमकं काय सांगतं?

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमचं घर कसं असावं? या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. जर आपल्या घराची रचना ही वास्तुशास्त्रानुसार नसेल तर घरात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात, असं मानलं जातं. मात्र अनेकदा असं होतं की, आपल्या घराची रचना योग्य असते, मात्र आपण काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतात. घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास अनेक प्रकारची संकटं निर्माण होऊ शकतात. जसं की, अचानक मोठं आर्थिक संकट निर्माण होणं, आरोग्याच्या समस्या, किंवा काहीही कारण नसताना भांडणं, वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर काही गोष्टी चुकूनही करू नयेत, यामुळे घरात वास्तूदोष निर्माण होतो. ज्यामुळे तुमच्या घरात गरीबी येऊ शकते. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.
पैशांचे व्यवहार – वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर पैशांचे व्यवहार टाळले पाहिजेत, जर सूर्यास्तानंतर तुम्ही पैशांची देवाण-घेवाण केली तर लक्ष्मी माता नाराज होते. त्यामुळे तुमच्या घरात गरीबी येऊ शकते, घरात बरकत राहत नाही, हातात आलेला पैसा खर्च होतो.
दान – वास्तूशास्त्रानुसार दान हे खूप पुण्याचं काम आहे, मात्र कधीही दान हे सूर्यास्तापूर्वी करावं, सुर्यास्तानंतर दान करू नये, कारण त्याचं अपेक्षित फळ तुम्हाला मिळत नाही, तसेच त्यामुळे तुमच्या घरात वास्तूदोष निर्माण होतो.
झोपू नये- वास्तूशास्त्रानुसार सूर्यास्तावेळी सायंकाळी सहा ते सात दरम्यान कधीही झोपू नये, कारण ही वेळ घरात लक्ष्मी माता येण्याची असते, त्यामुळे या काळात कधीही झोपू नये. या काळात घर स्वच्छ असावं. घरात सायंकाळच्या वेळी दररोज दिवा लावला गेलाच पाहिजे.
नख काढणे – वास्तुशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर नख काढणे, कटिंग करणे यासारखे काम सायंकाळच्यावेळी करू नये, त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.
कपडे धुणे – वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी कधीही कपडे धुवू नयेत. त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होतो.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
