नशेत बेडरुमचा दरवाजा वाजवत होता; वयाच्या 16व्या वर्षी अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव
फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना अभिनेत्रींना वाईट अनुभव येत असतात. त्यामधील एका अभिनेत्रीने धक्कादायक अनुभव सांगितला आहे. ती नेमकं काय म्हणाली जाणून घ्या...

अभिनयाच्या दुनियेत अनेक अभिनेत्रींना करिअरच्या सुरुवातीला खूप काही सहन करावे लागले आहे. ममूटी आणि मोहनलालसोबत काम करूनही एका अभिनेत्रीला असा अनुभव आला की त्या थरथर कापू लागल्या. त्या अभिनेत्रीने हेही सांगितले की जर तुम्ही तडजोड केली नाहीत तर तुमच्याकडून खूप मोठे काम हिसकावून घेतले जाऊ शकते. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुम जयराम यांनी इंडस्ट्रीतील प्रत्येक मोठ्या स्टारसोबत काम केले आहे. त्या खूप लहान वयातच अभिनयाच्या क्षेत्रात आल्या होत्या. पण अल्पवयातच त्यांच्यासोबत असा प्रसंग घडला की त्यांना प्रश्न पडला ‘एखादा डायरेक्टर असं कसं करू शकतो?’ नेमकं काय घडलं होतं? चला जाणून घेऊया…
ममूटी आणि मोहनलालसारख्या सुपरस्टार्ससोबत काम केल्यानंतर सुम जयराम यांची आज वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी इंडस्ट्रीतील वागणुकीबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की त्यांनाही इंडस्ट्रीत खूप काही सहन करावे लागले. त्यांनी त्या वाईट काळाबद्दल आणि छळवणुकीबाबत मोठा खुलासा केला आहे.
वाचा: सूरज चव्हाणचे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? वाचा संजनाविषयी
तडजोड केली नाही तर रोल कापला जायचा
इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, मल्याळम अभिनेत्री सुम जयराम यांनी एका मुलाखतीत आपल्यासोबत घडलेला वाईट अनुभव उघड केला. त्या म्हणाल्या, “मी खूप लहान वयात अभिनयाच्या दुनियेत आले. ९० च्या दशकात अभिनेत्रींना आपली भूमिका मोठी करायची असेल तर तडजोड करावी लागायची. ज्या अभिनेत्री अशी तडजोड करायला तयार नसत त्या मोठ्या संधी गमावत. अनेकदा कोणतेही कारण नसताना रोल कापले जायचे किंवा बदलले जायचे.”
‘मोठे संधी हातातून निघून जायची’
त्या पुढे म्हणाल्या, “त्यावेळी इंडस्ट्री अभिनेत्रींसाठी असुरक्षित झाली होती. आज #MeToo आहे, इंडस्ट्री खूप बदलली आहे. पण त्या काळात तसे नव्हते. खूप त्याग करावा लागायचा. जर तुम्ही तडजोड केली नाहीत तर तुमच्याकडून संधी निघून जायची. कोणी काही बोलायचे नाही कारण सगळ्यांचे कुटुंब असते. आजही जे बोलतात त्यांच्याकडून काम काढून घेतले जाते.”
रात्री १० वाजता डायरेक्टर दरवाजा ठोकत होता
एक धक्कादायक अनुभव सांगत त्या म्हणाल्या, “एकदा मी एका नावाजलेल्या डायरेक्टरसोबत शूटिंग करत होते. शूटिंगसाठी बाहेर जायचे होते म्हणून मी आईला सोबत घेतले होते. शूटिंग एका आठवड्याचे होते. सकाळचे शूटिंग संपवून मी आपल्या खोलीत गेले. पण रात्री साधारण १० वाजता कोणी तरी जोरजोरात माझा दरवाजा ठोकत होते. बाहेर पाहते तर तो डायरेक्टर नशेत धुत माझ्या खोलीबाहेर उभा होता. त्या वेळी मी फक्त १६-१७ वर्षांची होते. मी इतकी घाबरले की सांगता येणार नाही. मी दरवाजा उघडला नाही आणि तो निघून गेला. पण दुसऱ्या दिवशी शूटिंगला जाताच तो शिवीगाळ करत होता. मी कोणालाच काही सांगू शकले नाही.”
सुम यांनी हा खुलासाही केला की अनेक दिग्गज डायरेक्टर्सही असेच करायचे. नकार दिला की रोल कापले जायचे. “याच कारणामुळे मी छोट्या-छोट्या भूमिकांपुरतेच मर्यादित राहिले” असे त्या म्हणाल्या.
