AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खूप रडवले आणि पैसेही नाही दिले ‘या’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा, अभिनय क्षेत्रातील काळे सत्य सांगत…

अभिनय क्षेत्राबद्दल नुकताच एका अभिनेत्रीने मोठा खुलासा केलाय. आता अभिनेत्रीच्या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. उर्फी जावेद हिच्याकडून हा खुलासा करण्यात आलाय. उर्फी जावेद हिने आपल्या करिअरची सुरूवात ही टीव्ही मालिकांपासूनच केलीये. उर्फीने टीव्ही मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत.

खूप रडवले आणि पैसेही नाही दिले 'या' अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा, अभिनय क्षेत्रातील काळे सत्य सांगत...
Urfi Javed
| Updated on: Sep 21, 2024 | 3:30 PM
Share

अभिनेत्री उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. उर्फी जावेदची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. उर्फी जावेदने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. लोक उर्फी जावेदवर तिच्या कपड्यांमुळे जोरदार टीका कायमच करताना दिसतात. मात्र, होणाऱ्या टीकेचा काहीही परिणाम हा उर्फी जावेदवर अजिबातच होत नाही. उर्फी जावेदने तिच्या खासगी आयुष्याबद्दल मोठे खुलासे केले आहेत.

उर्फी जावेद हिने नुकताच आता मोठा खुलासा केलाय. अभिनय क्षेत्रामध्ये साईड कलाकारांना कशाप्रकारची वागणूक दिली जाते, याबद्दल तिने भाष्य केले आहे. उर्फी जावेदने मुलाखतीमध्ये म्हटले की, मला कधीच टीव्ही क्षेत्रामध्ये परत पुनरागमन करायचे नाहीये. टीव्हीचे बरेच प्रोडक्शन हाऊसेस खूप जास्त खराब आहेत. ते आपले पैसे कापून देतात आणि पैसे देण्यासही खूप जास्त उशीर करतात.

खूप जास्त खराब लोक टीव्हीमध्ये आहेत. मी ज्यावेळी टीव्ही मालिकेमध्ये काम करत होते, त्यावेळी माझी स्थिती खूप जास्त वाईट होती. कारण मी साईड रोल करत. खूप जास्त रडवायचे प्रोडक्शनवाले. हा मी खरोखरच बिग बॉसच्या निर्मात्यांचे धन्यवाद मानते. कारण माझ्यासाठी खरोखरच ती एकप्रकारची मोठी संधी नक्कीच होती.

तो अनुभव माझ्यासाठी चांगलाच राहिला…ठिक आहे काहीही असो मी बिग बॉसच्या घरात एक आठवडाभर थांबले. तिथून मी निघाल्यावर अनेक गोष्टी माझ्यासाठी नक्कीच बदलल्या. माझे करिअरमध्ये खूप जास्त उंच गेले. पण आता मला अभिनय क्षेत्रामध्ये काहीतरी करायचे आहे. माझे हे बोलणे ऐकून परत वेगवेगळे अर्थ काढले जातील.

मला जर विचारले जाईल की, तुला परत बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचे आहे तर नाही. मला आता चित्रपट करायचे आहेत किंवा ओटीटीवर यायचे आहे. म्हणजे काय तर आता उर्फी जावेद ही एखाद्या चित्रपटाच्या शोधात आहे किंवा तिला वेब सीरिजमध्येही काम करायचे आहे. आता उर्फी जावेद हिच्या या विधानाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा