The Kerala Story सिनेमासाठी रविवार ठरला लाभदायक; एका दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई

'द केरळ स्टोरी' सिनेमाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे... रविवारी सिनेमाने केली रेकॉर्ड ब्रेक कमाई.. सर्वत्र अदा शर्मा स्टारर 'द केरळ स्टोरी' सिनेमाची चर्चा...

The Kerala Story सिनेमासाठी रविवार ठरला लाभदायक; एका दिवसांत रेकॉर्ड ब्रेक कमाई
Follow us
| Updated on: May 15, 2023 | 12:57 PM

मुंबई : अभिनेत्री अदा शर्मा स्टारर ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) सिनेमाने चाहत्यांचं भरभरुन केलं. बॉक्स ऑफिसवर देखील सिनमा नवे विक्रम रचताना दिसत आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त ९ दिवसांत सिनेमात १०० कोटी रुपयांचा गल्ला ओलांडला आहे. ओपनिंग डेलाच सिनेमाला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळालं. गेल्या आठवड्यापासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. दुसऱ्या आठवड्यात देखील बॉक्स ऑफिसवर असलेला सिनेमाचा बोलबाला अद्याप कमी झालेला नाही. दुसऱ्या आठवड्यातील शनिवार आणि रविवार या दोन दिवसांचा ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाला मोठा फायदा झाला आहे. रविवारी एका दिवसांत सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे.

‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची सुरुवात प्रदर्शनानंतर समाधानकारक होती. पण त्यानंतर सिनेमाच्या व्यवसायात मोठी वाढ झाली आहे . ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. ९ दिवसांत सिनेमाने १०० कोटी रुपयांचा गल्ला पार केल्यानंतर सिनेमाच्या कमाईचे १० व्या दिवसाचे आकडे समोर आले आहेत.

चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांच्यानुसार, दुसऱ्या आठवड्याच्या रविवारी सिनेमाने तब्बल २३.७५ कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. प्रदर्शनानंतर सिनेमाने आतापर्यंत १३६.७५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे येत्या दिवसांत सिनेमा किती कोटी रुपयांपर्यंत मजल मारेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

हे सुद्धा वाचा

सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर तुफान चर्चा रंगली. शिवाय सिनेमाला विरोध देखील करण्यात आला. अनेक ठिकाणी सिनेमाचं प्रदर्शन देखील रोकण्यात आलं. एवढंच नाही तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी या सिनेमावर बंदी घालण्याची घोषणा केली. अद्यापही अनेक राज्यांमध्ये ‘द केरळ स्टोरी’ सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे.

नक्की काय आहे ‘द केरळ स्टोरी’ ?

‘द केरळ स्टोरी’ सिनेमा त्या अहवालांवर आधारित आहे ज्यानुसार केरळमधील सुमारे ३२ हजार महिलांना बळजबरीने इस्लाममध्ये धर्मांतरित करण्यात आलं आणि अनेकांना ISIS अंतर्गत सीरियात नेण्यात आलं. सिनेमाचे निर्माते म्हणतात की हा सिनेमा सत्य घटनांवर आधारित आहे आणि त्यामुळे तो अनेक वादांनी घेरला आहे…. सध्या सर्वत्र ‘द केरळ स्टोरी’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

Non Stop LIVE Update
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?
तर मी निवृत्ती घेतली असती, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणाले?.
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?
4 जूनला समजेल शो कोणाचा... देवेंद्र फडणवीसांचा रोख नेमका कुणावर?.
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर
मोदींना वारंवार महाराष्ट्रात का यावं लागतंय? फडणवीसांनी दिलं थेट उत्तर.
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेच घाटकोपर दुर्घटनेला जबाबदार, कारण... फडणवीसांचा हल्लाबोल.
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल
नामर्द म्हणत शिवसेनाचा अर्थ सांगून गुलाबराव पाटलांचा राऊतांवर हल्लाबोल.
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ...
ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूममध्ये CCTV चा डिस्प्ले 24 तास बंद अन् ....
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.