Dhurandhar 2: रणवीरचा ‘धुरंधर 2’ मार्चमध्ये प्रदर्शित होणार नाही? आदित्य धरने दिलं उत्तर
Dhurandhar 2 Release Date: रणवीर सिंहच्या 'धुरंधर 2' या चित्रपटाची चाहते आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत. परंतु 'केजीएफ' स्टार यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटासोबत थिएटरमध्ये टक्कर होणार असल्याने 'धुरंधर 2'च्या प्रदर्शनाची तारीख बदलू शकते, अशी चर्चा आहे.

Ranveer Singh Dhurandhar 2 Release Date: आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतकं यश कमावलं आहे की प्रदर्शनाच्या 40 दिवसांनंतरही प्रेक्षकांमध्ये त्याची चर्चा आहे. या चित्रपटाच्या शेवटी त्याच्या दुसऱ्या भागाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली होती. 19 मार्च 2026 रोजी ‘धुरंधर 2’ थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं त्याचवेळी स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु आता सोशल मीडियावर या तारखेवरून विविध चर्चांना उधाण आलं आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये होत आहे. यामागचं कारण म्हणजे 19 मार्च रोजीच साऊथ सुपरस्टार आणि ‘केजीएफ’ फेम यशचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. हे दोन्ही चित्रपट मोठे असल्याने नुकसान टाळण्यासाठी ‘धुरंधर 2’च्या निर्मात्यांनी माघार घेतल्याचं म्हटलं जात आहे.
‘धुरंधर’च्या प्रदर्शनासोबतच निर्मात्यांनी ‘धुरंधर 2’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली होती. ही तारीख 19 मार्च 2026 आहे. त्याचदिवशी साऊथ सुपरस्टार यशचा ‘टॉक्सिक’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. म्हणजेच या दोन्ही चित्रपटांमध्ये संघर्ष अटळ आहे. याचमुळे सोशल मीडियावर ‘धुरंधर 2’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याच्या चर्चा होत आहेत. येत्या 19 मार्च रोजी हा दुसरा भाग प्रदर्शित होणार नाही का, असा सवाल नेटकरी विचारत आहेत. या प्रश्नाचं उत्तर आता खुद्द दिग्दर्शक आदित्य धरने दिलं आहे. ‘धुरंधर 2’च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली जाणार नसल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

काय म्हणाला आदित्य धर?
आदित्य धरने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर काही चाहत्यांच्या पोस्ट शेअर केल्या आहेत. या पोस्टमध्ये चाहते दुसऱ्या भागासाठी खूपच उत्सुक असल्याचं दिसून येत आहे. रिपोस्ट करताना आदित्यने ‘धुरंधर 2’च्या प्रदर्शनाची तारीखही सांगितली आहे. एका चाहत्याला उत्तर देताना त्याने लिहिलं, ‘खूप गोड, धन्यवाद! येत्या 19 मार्च रोजी थिएटरमध्ये भेटू.’ या पोस्टवरून हे स्पष्टपणे दिसून येतंय की ‘धुरंधर 2’ हा चित्रपट नियोजित तारखेलाच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याच्या केवळ अफवा असून त्यात काही तथ्य नाही.
‘धुरंधर 2’मध्ये अक्षय खन्ना दिसणार की नाही, याबद्दलही प्रेक्षकांमध्ये संभ्रम होता. परंतु काही दिवसांपूर्वीच याबद्दलची माहिती समोर आली. या चित्रपटात अक्षयने रेहमान डकैतची भूमिका साकारली होती. पहिल्या भागात जरी त्याचा मृत्यू दाखवण्यात आला असला तरी बॅकस्टोरीमधून अक्षय खन्ना ‘धुरंधर 2’मध्येही दिसणार आहे. यासाठी तो जवळपास आठवडाभार शूटिंग करणार आहे.
