बिग बॉस 19 संपल्यानंतर तान्या मित्तल मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात; वाटली थेट चांदीची नाणी
बिग बॉस 19 संपल्यानंतर तान्या मित्तलने सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतले. यावेळी तिने पापाराझी व चाहत्यांना चांदीची नाणी वाटली. तसेच याद्वारे तिला आणि तिने सांगितलेल्या तिच्या बिझनेस अन् प्रॉपर्टीच्या गोष्टींना फेक म्हणणाऱ्यांना तान्याने उत्तर दिलं आहे अन् तिच्या संपत्तीबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला. तिच्या या कृत्याची काही जण प्रशंसा करत आहेत, तर काही जण याला प्रसिद्धीसाठी केलेली स्टंटबाजी म्हणत आहेत.

बिग बॉस सीझन 19 नुकताच संपला आहे. या सीझनमध्ये जर जास्त कोणाचं नाव चर्चेत राहिलं असेल तर ती म्हणजे तान्या मित्तल. संपूर्ण सीझनमध्ये तिने तिच्या संपत्तीच्या कहाण्यांनी चर्चा निर्माण झाली. पण त्याचबरोबर तिने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजनही केले. तान्या मित्तल तिच्या घरातल्या गोष्टी, किंवा तिच्या प्रॉपर्टीबदद्ल सांगत असताना बिग बॉस घरातील लोक तसेच हा शो पाहणारे प्रेक्षक दर वेळी आश्चर्य व्यक्त करत असतं. तसेच अनेकांनी तर तान्याच्या घरापासून ते तिच्या कारखान्यापर्यंत सर्व गोष्टींची चौकशी करण्याचा देखील प्रयत्न केला.
तान्या मित्तलने शोमधून बाहेर येताच श्रीमंतीचे दर्शन घडवले
जेव्हा मालती वाईल्ड कार्ड म्हणून आली होती तेव्हा तिने आणि सलमान खानने देखील एकदा तान्याला याबद्दल सांगितले होते की बाहेर अनेक लोक तिच्या घराबद्दल आणि तिच्या बिझनेसबद्दल खरं-खोटं तपासून पाहत आहेत. आणि अनेकजण तिला फेक म्हणत आहेत. पण आता तान्या मित्तलने शोमधून बाहेर आल्यावर तिच्या सर्व संपत्तीचा पुरावा दिला आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती एक-दोन लोकांना नाही तर अनेकांना चांदीची नाणी वाटताना दिसत आहे.
तान्या मित्तल सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली
बिग बॉस 19 संपल्यानंतर आणि तिला एकता कपूरचा शो ऑफर झाल्यानंतर, तान्या मित्तलने देवाचे आभार मानण्यासाठी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भेट दिली. तिला पाहण्यासाठी मंदिराबाहेर शाळकरी मुलं आणि तिच्या चाहत्यांची गर्दी जमली होती. दरम्यान, तान्या मित्तल तिच्या मागे येणाऱ्या पापाराझींना पाहून देखील आनंदीत झाली. तसेच ती त्यांना चांदीचे नाणे देऊन त्यांचे आभार मानताना दिसली.
Tanya Mittal surprises the media personnel by gifting them silver coins 😱😱pic.twitter.com/CtmGOyzTml
— BBTak (@BiggBoss_Tak) December 9, 2025
तान्याने केवळ पापाराझींनाच नव्हे तर तिला भेटायला आलेल्या एका चाहत्यालाही चांदीचे नाणे दिले, अशा प्रकारे तिने पुन्हा एकदा श्रीमंती दाखवताना दिसली. काही लोक तान्या मित्तलच्या या कृतीचे कौतुक करत आहेत, तर काही जण याला नाटक म्हणत आहेत.
सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
तान्या मित्तल चांदीची नाणी वाटतानाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर अनेक कमेंट्स येत आहेत. एका युजरने लिहिले की,” ती खरोखरच श्रीमंत निघाली, ती चांदीची नाणी वाटत आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले की, “तान्या मित्तलने बिग बॉसमध्ये इतका खोटारडेपणा पसरवला की आता ते लपवण्यासाठी काहीतरी करावे लागेल.” अशा अनेक प्रतिक्रिया येत आहेत
so proud of her, and she is right, makers never showed her Reality of her friends, they never showed clips of Neelam, Amal, ZQ backbitching about her so she was oblivious and yes even in bigg Boss she chose her self respect. 🔥#TanyaMittal#BiggBoss19
— Ahana (@ahanat117) December 9, 2025
