अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट पाहून चाहते संतापले, थिएटरच्या सीट्स फाडल्या,स्पीकर फोडले, नेमकं कारण काय?
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा असा एक चित्रपट जो पाहिल्यानंतर प्रेक्षक एवढे संतापले होते की त्यांनी चक्क थिएटरमध्ये तोड-फोड केली होती. साउंड सिस्टम टोडले होते, सीट्सही फाडल्या होत्या. असं काय झालं होतं?

बॉलिवूडमधील सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटांचे कोणी फॅन नाही असा एकहीजण सापडणार नाही. त्यांचे जुने चित्रपट असो किंवा आताचे चाहत्यांकडून आपल्या अभिनयातून ते कायमच कौतुक मिळवत आले आहेत. पण त्यांचा असा एक चित्रपट होता ज्यामुळे थिएटरमध्ये दंगा झाला होता. ज्या चित्रपटासाठी त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता त्याचं चित्रपटाने गोंधळ निर्माण केला होता.एवढा की, प्रेक्षकांनी थिएटरमधील जागा फाडल्या. खूप निदर्शने झाली, ज्यामुळे अमिताभ यांना रात्रभर बसून चित्रपटाचे डबिंग करावे लागले. अमिताभ यांनी याची कल्पनाही कधी केली नसेल.
प्रेक्षक संतापले आणि त्यांनी थिएटरमधील सीट्ही फाडल्या.
याबद्दल अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत सांगितले. 90 च्या दशकात अमिताभ बच्चन यांनी चित्रपटांपासून बराच ब्रेक घेतला होता आणि त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. अमिताभ यांना वाटले की चित्रपट उद्योग आता त्यांच्यावर पैसे लावण्यास तयार नाही. त्या काळात त्यांनी ‘अग्निपथ’ हा चित्रपटही केला होता. ज्यातील त्यांची विजय दीनानाथ चौहानची भूमिका घराघरात प्रसिद्ध झाली. पण या भूमिकेचे डबिंग करताना अमिताभ यांनी ते वेगळ्या आवाजात डब करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा अमिताभ यांचा बदललेला आवाज ऐकून प्रेक्षक संतापले आणि त्यांनी थिएटरमधील सीट्ही फाडल्या.
‘अग्निपथ’ प्रदर्शित झाल्यानंतर अभिषेक बच्चनने घडलेला प्रसंग सांगितला
अभिषेक बच्चनने एका मुलाखतीत त्याचे वडील अमिताभ बच्चन यांना ‘अग्निपथ’ चित्रपट पुन्हा डब करण्यासाठी रात्रभर बसावे लागल्याचं सांगितलं होतं.कारण अमिताभ यांनी जो आवाज चित्रपटात वापरला होता तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडला नाही. त्यामुळे प्रेक्षक प्रचंड नाराज झाले होते. थिएटरमध्ये तर चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी त्यांचा आवाज पूर्णपणे नाकारला होता.
थिएटरमधील साउंड सिस्टम तोडले होते
अभिषेक म्हणाला, ‘मला आठवतं की मी एका रात्री माझ्या वडिलांसोबत बसलो होतो आणि त्यांना पुन्हा अग्निपथ डब करताना पाहिले होतं. जेव्हा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा लोक एवढे संतापले होते की त्यांनी थिएटरमधील साउंड सिस्टम तोडले, कारण ते म्हणत होते की अमिताभ बच्चन यांच्या आवाजाला काय झालं? त्यांना वाटले की कदाचित स्पीकर बंद आहेत.’
View this post on Instagram
अमिताभ यांचा प्रयोग फसला होता
अमिताभ त्यांच्या भारदस्त आवाजासाठी ओळखले जातात, पण जेव्हा त्यांनी वेगळ्या आवाजात डबिंग केले तेव्हा प्रयोग उलटा झाला. पण एकदा अमिताभ यांना त्यांच्या याच भारदस्त आवाजामुळे चक्क नाकारण्यात आलं होतं. मात्र नंतर हाच आवाज त्यांची ओळख बनली. आणि लोकांच्या मनावर त्यांच्या याच आवजाने राज्य केलं. आणि जेव्हा हा आवाज प्रेक्षकांना ऐकायला मिळाला नाही तेव्हा मात्र प्रेक्षकांना ते रुचले नाही त्यांनी थेट थिएटरमध्येच संताप व्यक्त केला होता.
अमिताभ बच्चन स्टुडिओत गेले आणि रात्रभर डबिंग केली
अभिषेक बच्चन पुढे म्हणाला, ‘मला आठवतंय की आम्ही शुक्रवारी रात्री डबिंग स्टुडिओत गेले होतो. मी त्याच्यासोबत बसलो आणि झोपी गेलो. मी खूप लहान होतो. त्यांनी संपूर्ण रात्र त्यांच्या सामान्य आवाजात पुन्हा संपूर्ण चित्रपट डब करण्यात घालवली. आणि शनिवारी सकाळी 8 वाजता ते तिथून निघाले. मुकुल आनंदने मिक्सिंगसाठी कॅन घेतले आणि नंतर शनिवारी रात्री तो नवीन आवाजासह सर्वत्र प्रिंट पाठवले’
पण सर्व कठोर परिश्रम आणि प्रयत्नांनंतरही, ‘अग्निपथ’ बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप ठरला. चित्रपट 1990 मध्ये प्रदर्शित झाला. पण फ्लॉप असूनही, अमिताभच्या अभिनयाला चांगलीच पसंती मिळाली आणि त्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
