AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘अग्गबाई सासूबाई’ मालिका महत्वाच्या वळणावर, सोहम मनापासून मागणार आईची माफी?

'अग्गबाई सासूबाई' (Aggabai Sasubai) मालिकेला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे.

'अग्गबाई सासूबाई' मालिका महत्वाच्या वळणावर, सोहम मनापासून मागणार आईची माफी?
| Updated on: Dec 21, 2020 | 12:58 PM
Share

मुंबई :अग्गबाई सासूबाई‘ (Aggabai Sasubai) मालिकेला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद तर मिळत आहेच पण प्रेक्षक ‘आसावरी, अभिजित, शुभ्रा आणि बबड्या’ या व्यक्तिरेखांच्या प्रेमात आहेत. अभिजित सगळी प्रॉपर्टी सोहम च्या नावाने करून अभिजित आणि आसावरी घर सोडून निघून जातात.(Aggabai Sasubai series at a turning)

आपला एक वेगळा संसार थाटतात, शुभ्रा ही त्यांना सोहमच्या नकळत मदत करत असते. पण आता जसजशी मालिका पुढे जातेय मालिकेत खूप घडामोडी घडणार आहेत, पण आता ही मालिका एका निर्णायक वळणावर आली आहे.

प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण त्यांना लवकरच अनुभवता येणार आहे कारण त्यांचा आवडता बबड्या आता सुधारणार आहे. कूकिंग स्पर्धेनंतर आसावरीने केलेल्या भाषणातून सोहम ला खूप भरून येत त्याच्या डोळ्यात पाणी येत, आपण कुठेतरी चुकलो याची त्याला जाणीव देखील होते आणि तो मनापासून आई ची माफी मागतो, पण सोहमवर चिडलेली आसावरी सोहमला माफ करणार का? सोहमला त्याने केलेल्या चुकांची उपरती होणार का? आणि पुन्हा अभिजित – आसावरी परत आपल्या घरी जाणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील ‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता कमावली. जितकी आसावरी आणि अभिजीतची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली, तितकीच शुभ्राही प्रभावी ठरली. जसा सोहम म्हणजे बबड्याचा घरोघरी बोटं मोडून तिटकारा व्यक्त केला जातो, तसेच बबड्याचे आजोबाही अनेकांना आपलेसे वाटत. दिग्गज अभिनेते रवी पटवर्धन यांनी साकारलेली करारी, खमक्या आजोबांची भूमिका काही एपिसोड्समध्येच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले होते. मात्र त्याचे अचानक झालेले निधन यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

बबड्या-शुभ्रापेक्षाही लोकप्रिय व्यक्तिरेखा सोशल मीडियावर बबड्याच्या आजोबांसाठी अनेक मेसेज येत असल्याचं आपण पाहिलं आहे. अगदी तेजश्री प्रधान-आशुतोष पत्की यांच्या इन्स्टाग्राम पोस्टवरही आजोबांची आठवण काढली जात असे. आजोबांचं फॅन फॉलोइंग इतकं जबरदस्त होतं, की तेजश्रीने इन्स्टा स्टोरीमधून रवी पटवर्धन यांच्यासोबत फोटो शेअर करत आम्हालाही तुमची आठवण येते, सर्व काही सुरळीत झाल्यावर तुम्ही सेटवर परत येण्याची वाट पाहतोय, असं सांगावंसं वाटलं.

संबंधित बातम्या :

Aggabai Sasubai | ‘बबड्या’चे सगळेच डाव ‘निष्फळ’ ठरणार, आसावरी-अभिजीतला शुभ्रा पुन्हा एकत्र आणणार?

(Aggabai Sasubai series at a turning)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...