Aggabai Sunbai | सोहमच्या प्रतारणेमुळे आत्महत्या करणाऱ्या ‘शुभ्रा’च्या आयुष्यात येणार एक नवी व्यक्ती! 

लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आलं आहे. या प्रकरणाचा शुभ्राला मोठा धक्का बसल्याने तिने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेते.

Aggabai Sunbai | सोहमच्या प्रतारणेमुळे आत्महत्या करणाऱ्या ‘शुभ्रा’च्या आयुष्यात येणार एक नवी व्यक्ती! 
शुभ्रा-अनुराग

मुंबई : झी मराठीवरील ‘अग्गबाई सूनबाई’ (Aggabai Sunbai) या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. या मालिकेत शुभ्राचं रूप खूप वेगळं दाखवण्यात आलं आहे. सध्या मालिकेत दाखवत असलेली ही शुभ्रा थोडीशी बुजरी आहे. ती एका मुलाची आई आहे, तिला मुलाची काळजी आहे. मी करते ते बरोबर, की नाही हा भाव तिच्या मनात सतत असतो. या मालिकेत आसावरीने घराची सूत्र हाती घेतली आहेत. सोहम तिचा राईट हॅन्ड आहे, अभिजीत राजेंनी घरची जबाबदारी स्वीकारली आहे (Aggabai Sunbai Actor Chinmay Udgirkar will be seen as Anurag Gokhale).

शुभ्रा आणि अभिजित दोघांमध्ये बाबा आणि मुलीचं नातं आहे. बबडूची (मुलाची) पूर्ण जबाबदारी असल्याने शुभ्रा सध्या घरातच आहे. ती अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे. शुभ्रा अशी आहे त्याच्या मागचं कारण मुलाच्या म्हणजेच बबडूच्या जन्माच्यावेळेस निर्माण झालेली गुंतागुंत आणि सोहम सोबत संसार टिकवण्यासाठीची तिची धडपड सुरु आहे.

‘शुभ्रा’ उचलणार आत्महत्येचं पाऊल!

आता शुभ्राला आणखी एक धक्का बसला आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी सोहम आणि सुझेनचं प्रेमप्रकरण शुभ्रा समोर आलं आहे. या प्रकरणाचा शुभ्राला मोठा धक्का बसल्याने तिने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेते. त्याचवेळेस तिच्या समोर ‘अनुराग गोखले’ नावाची व्यक्ती येते. अशा कठीण प्रसंगात शुभ्राच्या आयुष्यात आलेला हा अनुराग कोण आहे?  याच उत्तर लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.

चिन्मयचं पुनरागमन

मालिकेतील या ट्वीस्ट निमित्ताने अभिनेता चिन्मय उदगीरकर पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करत आहे. याआधी चिन्मय झी मराठीवरील ‘नांदा सौख्य भरे’ या मालिकेतून प्रेक्षकांसमोर आला होता. आता तो अनुराग गोखले बनून कुलकर्णी कुटुंबात शुभ्राच्या आयुष्यात येणार आहे (Aggabai Sunbai Actor Chinmay Udgirkar will be seen as Anurag Gokhale).

मालिकेत येणार मोठं वळण!

सध्या मालिकेत शुभ्रा आणि सोहमच्या नात्यात येणाऱ्या अडचणी असा काहीसा ट्रॅक सुरु आहे. अद्वैत साकारत असलेला ‘सोहम’ हा जुन्या ‘सोहम’ प्रमाणे तिरसट आणि हेकेखोर आहे. पण, तो घाबरट मुळीच नाही. बेधडकपाने चुकीची कामे करणारी व्यक्तीरेखा असून, यात काहीशी नकारात्मक छटा देखील आहे. ‘शुभ्रा’, ‘अभिजित राजे’, ‘आसावरी’, ‘आजोबा’ आणि चिमुकला ‘बबडू’ असं सुखी कुटुंब असतानाही तो सुझेन नावाच्या एका मुलीच्या प्रेमात पडला आहे. या मुलीला त्याने आपली सेक्रेटरी म्हणून कामावर ठेवून घेतले आहे. इतकेच नाही तर, एरव्ही आई आणि बायकोसमोर, शांत आणि सुस्वभावी दिसणारा हा सोहम त्यांची पाठ फिरताच एका नव्या अवतारात प्रकट होतो. या अवतारातच तो सगळी गैरकृत्य करतो.

बायकोने घरात राहावं, अशी अपेक्षा बाळगणारा हा नवरा मात्र स्वतः स्वैराचार करत आहे. तेव्हा आता जुन्या शुभ्राने जसं तिच्या नवऱ्याला वठणीवर आणलं तसं ही शुभ्रा देखील या बबड्याला वठणीवर आणेल का?, असा प्रश्न रसिक प्रेक्षकांना पडला आहे. अर्थात ही मालिका नुकतीच सुरु झाली आहे आणि प्रेक्षकांना पुढे काय पाहायला मिळणार, हे हळूहळू उलगडत जाणार आहे.

(Aggabai Sunbai Actor Chinmay Udgirkar will be seen as Anurag Gokhale)

हेही वाचा :

Puglya | मराठी चित्रपटाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान, ‘पगल्या’ला तुर्की-ओन्कोमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार!

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सवरून सोनू सूदने चीनला सुनावले खडे बोल, चीनच्या राजदूताने दिली प्रतिक्रिया…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI