त्याने मला फरफटत जंगत नेलं…. त्याचे विचित्र हावभाव आणि… प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत ‘त्या’ रात्री घडलेली भयानक घटना
अभिनेत्री त्यांच्यासोबत घडणाऱ्या धक्कादायक घटना कायम चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता देखील एका अभिनेत्रीबद्दल घडलेली भयानत घटना समोर आली आहे. खुद्द अभिनेत्रीने तिच्यासोबत घटलेली घटना सांगितली आहे.

झगमगत्या विश्वातील अभिनेत्रींचं आयुष्य प्रचंड रॉयल आणि क्लासी असतं…असं अनेकांना वाटतं… पण असं नसतं. अभिनेत्रींना देखील त्यांच्या खासगी आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागतो… असंच काही टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत देखील झालं आहे. त्या रात्री घडलेली घटना अभिनेत्रीने स्वतःचा सांगितली आहे. एका पुरुषाने अभिनेत्रीने फरफटत जंगलात नेलं… पण नशीब चांगलं होतं, म्हणून अभिनेत्रीच्या मदतीसाठी दोन पुरुष धावत आले आणि त्या भयावक परिस्थितीतून अभिनेत्रीची सुटका केली.
सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून, अभिनेत्री रतन राजपूत आहे. रतन हिच्यासोबत दिल्लीत एक भयानक घटना घडली होती. 2022 मध्ये घडलेला प्रसंग सांगत अभिनेत्री म्हणाली, ‘आईसोबत फोनवर बोलत असताना एका मुलाने तिचा फोन हिसकावला. त्यानंतर रतन मदतीसाठी धावत होती.. अशात एक मुलगा तिच्या जवळ आला आणि काय झालं असं विचारलं?’
यावर रतन म्हणाली, ‘तो हात खेचत मला म्हणाला चल तुझा फोन मिळवून देतो… तेव्हा तो मला जंगलाच्या दिशेने ओढत घेवून गेला. त्यावेळी मला वाटतं आता काहीही खरं नाही.. त्याच्या तवडीतून स्वतःला सोडवण्यासाठी मी आरडाओरडा करत होते. पण मदत करायची सोडून काय होतंय पाहत होते.’
पुढे रतन म्हणाली, ‘त्यानंतर दोन मुली माझ्या मदतीसाठी धावत आल्या. त्यामधील एक म्हणाली, सोड तिला… तो मुलगा म्हणाला, नाही सोडणार ती माझी आहे… तो मुलगा मला खेचत होता. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव होते. मी चुकीच्या ठिकाणी फसत आहे… याची जाणीव मला होती… मदतीसाठी आलेल्या त्यांनी माला वाचवलं..’ असं देखील रतन म्हणाली. सध्या सर्वत्र रतन हिची चर्चा रंगली आहे.
रतन हिने ‘अगले जनम मोहे बिटीया ही किजो’, ‘राधा की बेटीया कुछ कर दिखाएंगी’ अशा अनेक मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री रतन राजपूत हिने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आजही तिच्या चर्चा चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात.
रतन आता अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर मात्र अभिनेत्री कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.
