आधी अथिया आता ‘तडप’ मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार सुनील शेट्टीचा मुलगा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

सुनील शेट्टीचा (Sunil Shetty) मुलगा अहान शेट्टीचा (Ahan Shetty) पहिला चित्रपट 'तड़प' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.

आधी अथिया आता 'तडप' मधून बॉलिवूडमध्ये पर्दापण करणार सुनील शेट्टीचा मुलगा, चाहत्यांची उत्सुकता शिगेला!

मुंबई : अभिनेता सुनील शेट्टीचा (Sunil Shetty) मुलगा अहान शेट्टीचा (Ahan Shetty) पहिला चित्रपट ‘तडप’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आता या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटात तारा सुतारिया (Tara Sutaria) अहानसोबत दिसणार आहे. हा चित्रपट तेलगू सुपरहिट फिल्म ‘RX100’ चा हिंदी रिमेक आहे. हा चित्रपट यावर्षी 24 सप्टेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे पहिले पोस्टर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. (Ahan Shetty and Tara Sutaria ‘Tadap’ movie poster displayed)

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

चित्रपटाचे हे पोस्टर तारा सुतारियाने सोशल मीडियावर शेअर केले आहे तिने लिहिले आहे की, ‘असंख्य भावना असलेली एक प्रेम कथा. अविश्वसनीय लव्ह स्टोरी 24 सप्टेंबर 2021 रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे. ‘ ताराबरोबर अहाननेही हे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टर शेअर करताना त्याने चित्रपटाचे निर्माते साजिद नाडियाडवाला आणि दिग्दर्शक मिलन लुथरिया यांचे आभार मानले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by TARA💫 (@tarasutaria)

अहान ‘तडप’ या चित्रपटात भूमिका करणार हे तीन वर्षांपूर्वीच जाहिर करण्यात आले होते. मात्र, काही दिवस हा चित्रपट लटकला होता. 2019 मध्ये तारा सुतारिया या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आले पण पुन्हा या चित्रपटाचे शूट लॉकडाउनमध्ये होऊ शकले नाही. चित्रपटाविषयी दिग्दर्शक मिलन यांनी सांगितले की, त्यांनी हा चित्रपट मूळ तेलगू चित्रपटापासून रुपांतरित केला आहे जेणेकरुन तो हिंदी प्रेक्षकांना आवडेल.

संबंधित बातम्या : 

Video : उस्तादाप्रमाणे तबला वाजवतेय सारा अली खान, तरीही नेटकऱ्यांनी केले ट्रोल!

हरभजन सिंह क्रिकेटनंतर अभिनय क्षेत्रात लावणार चौके-छक्के, पाहा ‘फ्रेंडशिप’ चित्रपटाचा टीझर!

कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ चित्रपट नेटफ्लिक्सवर करणार धमाल, पाहा टीझर 

(Ahan Shetty and Tara Sutaria ‘Tadap’ movie poster displayed)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI