‘कजरा रे’ गाण्यावर ऐश्वर्या राय अभिषेकसह लेक आराध्याही थिरकली; लग्नातला तो व्हिडिओ व्हायरल
ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि लेक आराध्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 'कजरा रे' गाण्यावर हे तिघेही थिरकताना दिसले.

बॉलिवूडमधील कायम चर्चेत राहणारं कपलं म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन. ही जोडी नेहमीच काहीना काही कारणांमुळे चर्चेत असतात. जेव्हा एकत्र बाहेर पडतात तेव्हा ते नेहमीच चर्चेत असतात. यावेळीही तेच घडले, ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. यावेळी त्यांची मुलगी आराध्या बच्चन देखील त्यांच्यासोबत होती. हे कुटुंब मुंबईत एका लग्नाला उपस्थित होते. त्याच लग्नातील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील ‘कजरा रे’ या गाण्यावर हे तिघेही थिरकले.
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी लेकीसह घेतला ‘कजरा रे’ गाण्याचा आनंद
एका लग्न समारंभात ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन राहुल वैद्य यांच्या ‘कजरा रे’ गाण्याचा आनंद घेताना दिसले. राहुल वैद्य हे गाणं गाताना दिसत आहे. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये ऐश्वर्या नाचताना दिसत आहे तर अभिषेक आणि आराध्याही थिरकताना दिसत आहेत. अभिषेकने शेरवानी घातली होती, तर ऐश्वर्याने आयव्हरी फुल-स्लीव्ह अनारकली सूट सोबत दुपट्टा. आराध्यानेही मॅचिंग लेहेंगा घातला होता. तिघेही अगदी साजेसे दिसत होते.
View this post on Instagram
गेल्या महिन्यात त्यांचा 18 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला
ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी गेल्या महिन्यात त्यांचा 18 वा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. या खास प्रसंगी, ऐश्वर्याने इंस्टाग्रामवर एक हृदयस्पर्शी कुटुंबाचा फोटो शेअर केला, ज्यामध्ये तिचा पती अभिषेक आणि तिची मुलगी आराध्या होती. तिघेही एकमेकांसोबत पोज देताना दिसत होते.
अखेर त्या अफवांना पूर्णविराम
काही महिन्यांपूर्वी, ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्या. तथापि, यानंतर हे जोडपे अनेक वेळा एकत्र दिसले. ज्यामुळे त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. त्यानंतर ऐश्वर्या आणि अभिषेक मुंबईत आशुतोष गोवारीकर यांचा मुलगा कोणार्क गोवारीकरच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये दिसले होते. डिसेंबरमध्ये एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये ते एकत्र दिसले होते. त्यांनी त्यांची मुलगी आराध्याचा वाढदिवसही एकत्र साजरा केला. या सर्व पोस्टने त्यांच्यात सर्व काही ठीक आहे याची चाहत्यांना पावती दिली.