Abhishek Bachchan Aishwarya Rai: परफेक्ट फॅमिली ! एअरपोर्टवर आराध्यासह दिसले ऐश्वर्या-अभिषेक, चाहते म्हणाले..
ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक यांच्या नात्यातील तणावाच्या बातम्या आल्यानंतर, हे जोडपं नुकतंच विमानतळावर दिसले. या दोघांचेही चाहते बऱ्याच काळानंतर या कुटुंबाला एकत्र पाहून खूप आनंदी आहेत.

अलिकडेच, बॉलिवूड सौंदर्यवती अभिनेत्री ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या हे मुंबई विमानतळावर स्पॉट झाले. हे तिघेही फॅमिली व्हेकेशनवरून परत आले आहेत. मात्र, हे तिघेही बऱ्याच दिवसांनी एकत्र दिसले, त्यामुळे त्यांचे चाहतेही खूप आनंदी दिसत होते. . विमानतळावर एकत्र आलेल्या या तिघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. लूकबद्दल बोलायचे झाले तर, आराध्या आणि ऐश्वर्या, कलर ट्विनिंग करत सारख्याच कपड्यांमध्ये दिसल्या.
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांच्या नात्याबद्दल बऱ्याच काळापासून विविध अटकळी वर्तवल्या जात होत्या. त्यांच्यात काही आलबेल नाही, ते एकत्र रहात नाहीत अशा विविध बातम्या समोर येत होत्या. मात्र ऐश्वर्या- अभिषेक किंवा बच्चन कुटुंबापैकी कोणीच यावर मौन सोडले नाही. त्यानंतरच आता हे जोडपं त्यांच्या मुलीसह एकत्र दिसल्यानंतर त्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतरही, अभिषेकचा त्याच्या कुटुंबाची काळजी घेणारा स्वभाव लोकांना आवडू लागला आहे. तर ऐश्वर्याचा ब्लॅक ड्रेसमधला लूकही लोकांना प्रचंड आवडला, आराध्यानेही आईशी मॅचिंग कपडे घातले होते.
विभक्त होण्याच्या चर्चा
गेल्या वर्षापासून ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या येत आहेत. खरंतर, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नादरम्यान त्यांच्या विभक्त होण्याच्या बातम्या सुरू झाल्या. दोन्ही स्टार्स त्या कार्यक्रमात वेगवेगळे पोहोचले होते, त्यानंतर अशा बातम्या येऊ लागल्या. अभिषेक हा संपूर्ण कुटुंबासह लग्नाला आला तर त्यानंतर ऐश्वर्या आणि आराध्या यांची वेगळी एंट्री झाली. तेव्हापासून त्यांच्यातील दुराव्याच्या चर्चा वाढल्या. एवढंच नव्हे तर, या कार्यक्रमाव्यतिरिक्त, ऐश्वर्या-अभिषेक हे दोघेही इतर अनेक कार्यक्रमांमध्ये वेगळे दिसू लागले तेव्हापासून तर विविध चर्चांना उधाण आलं. मात्र आता अभिषेक-ऐश्वर्या आणि आराध्या हे तिघेही फॅमिली व्हेकेशनवरूनपरतताना पाहून अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.
View this post on Instagram
कामाचं काय ?
त्या दोघांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ऐश्वर्या बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे, तर अभिषेक अनेक प्रोजेक्ट्सवर काम करत आहे. सध्या तो ‘किंग’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या चित्रपटात शाहरुख खानची भूमिका असून, किंग खानची मुलगी सुहाना खानसोबत ही चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. या चित्रपटात अभिषेक निगेटीव्ह भूमिकेत, खलानायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा असून त्याचं काम पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.
