ऐश्वर्या राय रोज पहाटे या वेळेला उठतेच; सर्वात आधी करते हे काम, हेच तिच्या यशाचं सिक्रेट
ऐश्वर्या रायने तिच्या दिनचर्येबद्दल कायम चर्चा केली आहे. झोपण्यासा कितीही उशीर होऊ दे ऐश्वर्या पहाटे यावेळेला उठतेच. एवढंच नाही तर ती उठल्याबरोबर एक काम नेहमी करते. ही सवय तिने आजपर्यंत जोपासली आहे. हेच तिच्या सौंदर्याचे आणि यशाचे रहस्य आहे.

बॉलिवूडची सुंदरी ऐश्वर्या राय तिच्या सौंदर्यासाठी, तिच्या अभिनयासाठी तसेच तिच्या परफेक्शनसाठी ओळखली जाते. चाहते नेहमीच तिच्या सौंदर्याच्या प्रेमात असतात. दरम्यान ऐश्वर्याबद्दल सगळेच जाणून घेण्यास उत्सुक असतात. कारण चाहते तिला फॉलो करतात. ऐश्वर्या रायने देखील अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मीडियासोबत माहिती शेअर केली आहे. तिने तिच्या सकाळच्या दिनचर्येबद्दलही माहिती दिली आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या ऐश्वर्या रायने कधीही सोडल्या नाहीत.
ऐश्वर्या रायचा दिवस सकाळी किती वाजता सुरु होतो?
ऐश्वर्या रायने अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मीडियासोबत माहिती शेअर केली आहे. तिने तिच्या सकाळच्या दिनचर्येबद्दलही माहिती दिली आहे. काही गोष्टी अशा आहेत ज्या ऐश्वर्या रायने कधीही सोडल्या नाहीत. ऐश्वर्या राय बच्चन म्हणते की तिने वर्षानुवर्षे लवकर उठण्याची सवय कायम ठेवली आहे. तिच्या मते, तिचा दिवस साधारणतः पहाटे 5 ते 5.30 वाजता सुरू होतो.
ऐश्वर्याची ही सवय आजही ती फॉलो करते
एवढंच नाही तर ऐश्वर्या दररोज सकाळी दोन ते तीन ग्लास पाणी पिते, ही सवय आजपर्यंत तिने कायम ठेवलेली आहे. ऐश्वर्या म्हणते की सकाळी लवकर उठून भरपूर पाणी पिल्याने तुम्ही मानसिकदृष्ट्या निरोगी राहताच शिवाय तुमचे सौंदर्यही वाढते. ऐश्वर्याच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी पाणी पिल्याने तुमचा चेहरा चमकतो. दिवसभरात शक्य तितके पाणी प्यावे.
View this post on Instagram
24 तासांत 48 तास काम करावं लागतं
तिने त्या मुलाखतीत सांगितले होते की तिचे आयुष्य इतके व्यस्त आहे की तिला 24 तासांत 48 तास काम करावं लागतं. आई होणे, अभिनय करणे आणि प्रवास करणे यासारख्या जबाबदाऱ्या असूनही, ही शिस्त तिला संतुलन राखण्यास मदत करते. तसेच ऐश्वर्या म्हणते, “माझ्या आयुष्यात इतक्या गोष्टी आहेत की मी त्या सर्व एकाच पॅटर्नमध्ये बसवू शकत नाही, पण एक गोष्ट निश्चित असतात त्यामुळे माझा दिवस खूप लवकर सुरू होतो.”
ऐश्वर्याचे हे यशाचं सिक्रेट
तसेच जेव्हा ऐश्वर्याला विचारण्यात आले की तिचा असा काही विशिष्ट मंत्र आहे का जो तिला दररोज प्रेरणा देतो, तेव्हा ती म्हणाली, “माझ्याकडे असा कोणताही विशिष्ट मंत्र नाही. पण मी नेहमी सकारात्मक राहण्यावर विश्वास ठेवते.” अशापद्धतीने ऐश्वर्या राय तिच्या सवयी वर्षानूवर्ष जपत आली आहे. त्यामुळे ती आज एक परफेक्ट आई, अभिनेत्री आणि व्यक्ती आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे तिचे हे सिक्रेट आहे जे तिला आजही लोकप्रियतेच्या शिखरावर ठेवते.
