AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मालिका विश्वातून थेट रंगभूमीवर; ‘आता थांबवायचं कसं?’ मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण

मालिका विश्वात ज्या प्रेमाने प्रेक्षकांनी ऐश्वर्याला स्वीकारलं, त्याच प्रेमाची अपेक्षा ती या नाटकासाठी व्यक्त करते. "हे नाटक म्हणजे केवळ मनोरंजन नाही, तर अनेक मुलींसाठी एक ताकद आहे. तरुण पिढीने आपल्या पालकांसोबत हे नाटक आवर्जून पाहावं आणि आम्हाला भरभरून प्रेम द्यावं, हीच माझी इच्छा आहे," असे तिने सांगितलं.

मालिका विश्वातून थेट रंगभूमीवर; 'आता थांबवायचं कसं?' मधून ऐश्वर्या शेटेचे दमदार पदार्पण
ऐश्वर्या शेटेImage Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2026 | 3:42 PM
Share

मालिकांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेली लाडकी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे आता एका नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर आणि भरत नारायणदास ठक्कर हे पाच ताकदीचे आणि दिलदार निर्माते या नाटकासाठी एकत्र आले आहेत. दिग्दर्शक संदीप दंडवते यांच्या ‘आता थांबवायचं कसं?’ या नाटकाच्या निमित्ताने ऐश्वर्या व्यावसायिक रंगभूमीवर पाऊल ठेवत आहे. मालिकांच्या धावपळीतून थेट नाट्यगृहाच्या मंचावर येण्याचा हा अनुभव तिच्यासाठी केवळ काम नसून एक ‘युनिव्हर्सिटी’ असल्याच्या भावना तिने व्यक्त केल्या आहेत.

शूटिंगचे ‘क्विक डिलिव्हरी’ आणि नाटकाचे ‘लाईव्ह अनुभव’

आपल्या या पहिल्या वहिल्या नाटकाबाबत बोलताना ऐश्वर्या सांगते, “मालिकांच्या शूटिंगमध्ये आपल्याला पटकन प्रतिसाद द्यावा लागतो, कधीकधी ‘क्विक डिलिव्हरी’ करावी लागते. पण नाटकाच्या तालमींत एका वाक्याचे विविध अर्थ आणि हावभाव कसे बदलतात, हे शिकायला मिळतंय. मालिकांमधून प्रसिद्धी मिळते, पण नाटकाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या ‘लाईव्ह’ प्रतिक्रियांची जी ऊर्जा मिळते, ती काही वेगळीच आहे. मालिकेच्या सेटवर चुका सुधारण्यासाठी 10-15 दिवस मिळतात, पण रंगमंचावर ‘वन टेक’ मध्ये सगळं परफेक्ट करायचं असतं, त्याची एक वेगळीच धाकधूक आणि एक्सायमेंट आहे.”

सुकन्या मोने-गिरीश ओक; प्रत्यक्ष आयुष्यातील ‘आई-बाबा’

या नाटकात सुकन्या मोने आणि डॉ. गिरीश ओक हे तिचे आई-बाबा साकारत आहेत. याबद्दल ती भावूक होऊन सांगते, “सुकन्या ताईंच्या मायेने आणि गिरीश सरांच्या अनुभवाने मला या भूमिकेत घडवलंय. तालमींच्या वेळी सुकन्या ताईंच्या ‘अलीबाबाच्या गुहेसारख्या’ असलेल्या बास्केटमधून सतत मिळणारे खाऊ आणि त्यांची आपुलकी यामुळे आमच्यात खरोखरच आई-मुलीचं नातं निर्माण झालंय. ही दिग्गज माणसं माझ्यासाठी एका विद्यापीठासारखी आहेत.”

‘निर्जीव फोन’ आणि ‘जिवंत संवाद’

नाटकाच्या विषयावर भाष्य करताना ऐश्वर्या तरुणाईला एक महत्त्वाचा संदेश देते. “आजच्या तरुण पिढीला सतत मोबाईल आणि टेक्नॉलॉजीची सवय लागली आहे. ‘निर्जीव फोन स्मार्ट झालाय आणि जिवंत माणूस बावळट’ असे एक वाक्य नाटकात आहे, जे आजचं भीषण वास्तव आहे. या नाटकातून आम्ही एकच संदेश देतोय – पालकांशी ‘ट्रान्सपरन्सी’ ठेवा आणि पालकांनी मुलांच्या चुकीवर भडीमार करण्यापेक्षा त्यांना समजून घेऊन ‘मी तुझ्यासोबत आहे’, हे आश्वासन द्या. हा ‘जनरेशन गॅप’ कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे”, असं ती सांगते.

Follow Us
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत
Sanjay Raut | शिवसेना ठाकरे गटदेखील डिलिमीटेशन विधेयकाला पाठिंबा देणार? संजय राऊत काय म्हणाले?
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितल
वर्षा बंगल्यावर रात्रीच्या भेटीत नेमकं काय घडलं? जयंत पाटलांनी सांगितली A टू Z माहिती
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर
डिलिमीटेशन विधेयकाबाबत मोठी अपडेट! भाजपचा मोठा डाव? 'त्या' एका अटीवर विरोधकांचा मिळणार पाठिंबा, एकाऐकी काय घडलं?
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे
ठाकरेंचे फुटीर खासदार अन् अमित शाहांच्या भेटीची इन्साइड स्टोरी; सुमारे 50 मिनिटांच्या बैठकीत...
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच
शरद पवार अखेरचा पत्ता कधी उघडणार? जयंत पाटील-तटकरे आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा.

कर्जमाफीनंतर शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी, वीजबील माफ होणार, CM फडणवीस यांची मोठी घोषणा

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून.

Supriya Sule: डिलिमिटेशनचा राज्याला’महा’फायदा? 50 टक्के फॉर्म्युल्याने किती जागा वाढणार? सुप्रिया सुळेंकडून महाराष्ट्रातील खासदारकीचे गणित घ्या समजून

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण...

Oil Crisis : आपल्याकडे स्वत:च तेल नाही पण पुढच्या काही दिवसात जगातले अनेक देश तेलासाठी भारतावरच अवलंबून राहतील, कारण..

उघडं अंग, फाटकी जीन्स बनली फॅशन, 28 वर्षांपूर्वीच्या सलमानच्या या गाण्यावर तरूणी आजही फिदा.

उघडं अंग, फाटकी जीन्स बनली फॅशन, 28 वर्षांपूर्वीच्या सलमानच्या या गाण्यावर तरूणी आजही फिदा

FIFA World Cup 2026 स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनने गाठताच टीम इंडियाच्या आशा वाढल्या, दुसऱ्यांदा असं होणार.

FIFA World Cup 2026 स्पर्धेची अंतिम फेरी स्पेनने गाठताच टीम इंडियाच्या आशा वाढल्या, दुसऱ्यांदा असं होणार

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ.

Coastal Raod Accident : कोस्टलरोडमध्ये भीषण अपघात, बोगद्यात कारच पेटली, शेकडो गाड्या अडकल्या; मोठी खळबळ