Drishyam 2: ‘दृश्यम 2’ला वाचवण्यासाठी अजयला भरावे लागले इतके कोटी रुपये

युट्यूब चॅनलच्या मालकाशी अजयला करावी लागली तडजोड; काय आहे प्रकरण?

Drishyam 2: 'दृश्यम 2'ला वाचवण्यासाठी अजयला भरावे लागले इतके कोटी रुपये
Ajay DevgnImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Oct 24, 2022 | 10:45 AM

मुंबई- अजय देवगणचा (Ajay Devgn) आगामी ‘दृश्यम 2’ (Drishyam 2) हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटासाठी अजयला तब्बल साडेतीन कोटी रुपये भरावे लागले आहेत. गोल्डमाइन्स युट्यूब चॅनलचा मालक मनिष शाह आधीच दृश्यम 2 चा हिंदी व्हर्जन रिलीज करणार होता. त्याची घोषणासुद्धा त्याने सोशल मीडियावर केली होती. अखेर चित्रपटाचं नुकसान टाळण्यासाठी अजयने मनिष शाहला साडेतीन कोटी रुपये दिल्याचं वृत्त आहे.

ई टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, अजय देवगण आणि दृश्यम 2 चे निर्माते कुमार मंगल यांनी मनिष शाहशी या विषयावर चर्चा केली. हिंदी व्हर्जनचं प्रदर्शन रोखण्यासाठी किती पैसे पाहिजेत, अशी विचारणा त्यांनी मनिषला केली. तेव्हा त्याने साडेतीन कोटी रुपयांची मागणी केली. दृश्यम 2 च्या निर्मात्यांनी त्याची ही मागणी लगेच पूर्ण केली आणि चित्रपटाला व्हाइट कॉलर पायरसीपासून वाचवलं.

साडेतीन कोटी रुपये मिळाल्यानंतर मनिष शाहने दृश्यम 2 च्या हिंदी व्हर्जनला प्रदर्शित करणार नसल्याचं जाहीर केलं. दृश्यम 2 हा चित्रपट येत्या 18 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. मनिष शाहने दृश्यम 2 च्या हिंदी व्हर्जनचे हक्क तेलुगू चित्रपटाचे निर्माते सुरेश डी बाबू यांच्याकडून विकत घेतले होते. त्यामुळे मनिष त्या चित्रपटाला हिंदीमध्ये डब करू शकत होता.

हे सुद्धा वाचा

हिंदी व्हर्जनच्या प्रदर्शनाआधी जर डब केलेला व्हर्जन प्रदर्शित झाला असता तर अजय देवगण आणि निर्मात्यांना मोठं नुकसान झालं असतं. त्याचसोबत चित्रपटातील सस्पेन्स प्रेक्षकांसमोर आला असता. अशा परिस्थितीत मनिष शाह यांच्याशी चर्चा करून मार्ग काढण्याची युक्ती अजयने लढवली.

2015 मध्ये दृश्यम हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला हा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांच्या मल्याळम चित्रपटाचा हा हिंदी रिमेक होता. पहिल्या भागाचं यश पाहता निर्मात्यांनी या चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Non Stop LIVE Update
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप
नकली शिष्य, दिघेंनी सांगूनही राजीनामा... शिंदेंचे विचारेंवर गंभीर आरोप.
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?
कोंबडी विकता-विकता शिवसेनेत... राणेंवर पलटवार करत कुणाची खोचक टीका?.
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?
रोहित पवार स्वतः गुंड...कर्जत जामखेडवरून गुंडांना आणलंय, कुणाची टीका?.
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?
माझा आवडता भाचा श्रीकांत शिंदे, कारण... सुषमा अंधारे काय म्हणाल्या?.
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.