अक्षय – ट्विंकलच्या लेकीला पाहून उंचावतील भुवया, तिच्या क्यूटनेसने मोडले सर्व रेकॉर्ड
Akshay Kumar Daughter: अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांच्या लेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल, तिच्या क्यूटनेसने मोडले सर्व रेकॉर्ड... अभिनेत्याची मुलं कायम लाईमलाईट पासून असतात दूर

Akshay Kumar Daughter: अभिनेत्री ट्विंकल खन्ना आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी 90 च्या दशकात बॉलिवूडवर राज्य केलं. अक्षय आजही मोठ्या पडद्यावर सेक्रिय आहे. पण ट्विंकल हिने मात्र लग्नानंतर अभिनयाचा निरोप घेतला. लग्नानंतर ट्विकलने अधिक वेळ कुटुंबासाठी दिला. अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी दोन मुलं आहे. त्यांच्या मुलाचं नाव आरव कुमार असं असून मुलीचं नाव नितारा कुमार असं आहे. सांगायचं झालं तर, इतर सेलिब्रिटींच्या मुलांप्रमाणे अक्षय – ट्विंकल यांची मुलं सतत चर्चेत नसतात.
काही दिवसांपूर्वी ट्विंकल खन्ना हिला लेक नितारा हिच्यासोबत विमानतळावर स्पॉट करण्यात आलं होतं. अभिनेता कायम मुलीला पापाराझींपासून दूर ठेवते. पण जेव्हा नितारा हिची एक झलक दिसते, तेव्हा तिला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी निताराच्या भोवती गर्दी करतात.
View this post on Instagram
पण आता जेव्हा नितारा सर्वांसमोर आली तेव्हा अनेकांच्या नजरा तिच्यावर येवून थांबल्या. सध्या सोशल मीडियावर नितारा हिया एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ जुना असून त्यामध्ये अक्षयच्या मुलीचा चेहरा स्पष्ट दिसत आहे. व्हिडीओमध्ये नितारा तिने केस निट करताना दिसत आहे.
व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘नितारा किती मोठी झाली आहे. हुबेहूब तिच्या आई सारखी दिसते.’ अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘ही तर रवीनाच्या मुलीरेक्षा क्यूट आहे.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘सुपरस्टार रेडी झाली आहे…’ सध्या सर्वत्र अक्षयच्या लेकीची चर्च रंगली आहे.
सांगायचं झालं तर, व्हिडीओमध्ये नितारा आणि ट्विंकलनंतर डिंपल कपाडिया देखील दिसत आहेत. डिंपल आणि ट्विंकलनेही पॅपला फोटोसाठी पोज दिली. मात्र, अक्षय कुमारची मुलगी नितारा हिने सर्वांचे लक्ष वेधले यात शंका नाही. व्हिडीओवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
मुलाबद्दल कायम म्हणालेला अक्षय कुमार?
एका टॉक शोमध्ये अक्षय कुमार याने अनेक वर्षांनंतर मुलगा आरव याच्याबद्दल सांगितलं आहे. अभिनेता म्हणाला, ‘माझा मुलगा आरव लंडन युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण पूर्ण करत आहे. त्याला वाचायला प्रचंड आवडतं. त्याला एकटं राहायला आवडतं.’
‘घर सोडून लंडन येथे जाण्याचा निर्णय देखील त्याचा स्वतःचा होता. मी त्याला थांबवण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण त्याला थांबवू शकलो नाही, कारण मी स्वतः वयाच्या 14 व्या वर्षी घर सोडलं होतं. आरव लंडन याठिकाणी एकटा राहातो. आरव स्वतःचे कपडे स्वतःता धुवतो. त्याला स्वयंपाक देखील उत्तम बनवता येतो…’
पुढे अक्षय कुमार म्हणाला, ‘एकदा आरव माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मला सिनेमांमध्ये काम करायचं नाही. तेव्हा मी त्याला म्हणालो, तुझं आयुष्य आहे तुला जे करायचं आहे ते कर…’, आरव इतर स्टारकिड्स प्रमाणे कधीच लाईमलाईटमध्ये नसतो. कधीतरी आरव याला कुटुंबासोबत स्पॉट करण्यात येत.
