अक्षय कुमारला घालावे लागायचे सॅनिटरी पॅड, कारण…
Akshay Kumar: अक्षय कुमारला घालावे लागायचे सॅनिटरी पॅड, खुद्द अभिनेत्याने सांगितलं यामागचं कारण..., जाणून व्हायल अवाक्... अभिनेता कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे असतो चर्चेत...

अभिनेत्री अक्षय कुमार याने अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फक्त भारतात नाही तर, सातासमुद्रा पार देखील आहे. सध्या अभिनेता ‘स्त्री 2’ सिनेमात बजावलेल्या पाहुण्या कलाकारच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. तर दुसरीकडे अभिनेत्याचा ‘खेल खेल में’ सिनेमा देखील मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता प्रत्येक सिनेमात वेगळी भूमिका साकारत चाहत्यांपर्यंत खास संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो.
दरम्यान, अभिनेता अक्षय कुमार याने ‘पॅड मॅन’ सिनेमात देखील वेगळी भूमिका साकारली होती. सिनेमात अभिनेत्याने अरुणाचलम मुरुगनंथम यांच्या भूमिकेला न्याय दिला. अरुणाचलम यांनी सॅनेटरी पॅड तयार करणारी सर्वात स्वस्त मशीन तयार केली.
View this post on Instagram
सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान अक्षय कुमार याने मोठा खुलासा केला होता. सिनेमाच्या शुटिंग दरम्यान अभिनेला गुलाबी रंगाची पँट आणि सॅनेटरी पॅट घालावे लागत होते. अभिनेता म्हणाला होता, ‘प्रत्येक घरा प्रमाणे मला देखील मासिक पाळी बद्दल काहीही माहिती नव्हतं… तरुण वयात आल्यानंतर थोडं फार काही माहिती झालं.’ त्यामुळे अभिनेत्याने महत्त्वाच्या विषयावर सिनेमा तयार करण्याचा निर्णय घेतला.
अक्षय कुमारच्या फ्लॉप सिनेमांचं कारण काय?
गेल्या काही वर्षांमध्ये अक्षय कुमार याने अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. पण अभिनेत्याचा कोणताच सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करु शकला नाही. सिनेमे सतत फ्लॉप होत असल्यामुळे अभिनेत्याला सतत मेसेज यायचं. यामुळे लोकांना वाटायचं अभिनेता गायब झाला आहे. यावर अक्षय म्हणाला, ‘मला काहीही झालं नाही, मी याठिकाणीच आहे…’
सांगायचं झालं तर, अक्षय कुमार याचे सिनेमे सतत फ्लॉप होत आहेत. पण तरी देखील अभिनेत्याचे 6 सिनेमे अद्याप प्रदर्शित व्हायचे आहेत. अक्षय कुमार एका सिनेमासाठी 60 ते 100 कोटी रुपये मानधन घेतो. अभिनेत्याची नेटवर्थ 2500 कोटी रुपये आहे.
