Samrat Prithviraj vs Vikram: अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ला मागे टाकत कमल हासन यांचा ‘विक्रम’; दणक्यात कमाई सुरू

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 05, 2022 | 12:33 PM

बॉक्स ऑफिसवर 'सम्राट पृथ्वीराज' या चित्रपटासोबत कमल हासन यांचा 'विक्रम' (Vikram) आणि अदिवी शेषचा 'मेजर' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या तीन चित्रपटांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. कमाईच्या बाबतीत विक्रमने पहिल्याच दिवशी अर्धशतक झळकावलं आहे.

Samrat Prithviraj vs Vikram: अक्षय कुमारच्या 'सम्राट पृथ्वीराज'ला मागे टाकत कमल हासन यांचा 'विक्रम'; दणक्यात कमाई सुरू
Samrat Prithviraj and Vikram
Image Credit source: Twitter

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर यांचा मेगा-बजेट चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’ (Samrat Prithviraj) हा शुक्रवारी 3 जून रोजी प्रदर्शित झाला. जवळपास 300 कोटींचा बजेट असलेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी 11 कोटींची कमाई केली. मात्र पहिल्या वीकेंडमध्ये 50 कोटींच्या क्लबमध्ये समाविष्ट होणं या चित्रपटासाठी अवघड ठरतंय. बॉक्स ऑफिसवर ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटासोबत कमल हासन यांचा ‘विक्रम’ (Vikram) आणि अदिवी शेषचा ‘मेजर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या तीन चित्रपटांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे. कमाईच्या बाबतीत विक्रमने पहिल्याच दिवशी अर्धशतक झळकावलं आहे. ‘सम्राट पृथ्वीराज’ने दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर किती कोटींची कमाई केली आणि दोन दिवसांत किती कोटींचा गल्ला जमवला ते जाणून घेऊयात..

‘सम्राट पृथ्वीराज’ने पहिल्या दिवशी 11 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी अक्षय कुमारच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर वेग पकडला आणि 12.50 कोटींचा टप्पा गाठला. म्हणजेच ‘सम्राट पृथ्वीराज’ने दोन दिवसांत 23 कोटींची कमाई केली आहे. पण बजेटच्या तुलनेच या चित्रपटाला कमाई करावी लागणार आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश याठिकाणी ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. रविवारी अक्षय कुमारच्या चित्रपटाची चांगली कमाई होऊ शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जरी 15 ते 16 कोटींची कमाई केली तरी पहिल्या वीकेंडला 50 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणं त्याच्यासाठी कठीण होणार आहे.

हे सुद्धा वाचा

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शचं ट्विट-

सम्राट पृथ्वीराजची कमाई-

शुक्रवार- 11 कोटी रुपये
शनिवार- 12.50 कोटी रुपये
एकूण- 23 कोटी रुपये

कमल हासन यांचा तमिळ चित्रपट ‘विक्रम’देखील 3 जून रोजी प्रदर्शित झाला. कमल हासन यांच्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी तब्बल 58 कोटींची कमाई केली. प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी हा चित्रपट 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI