Video | पाठक बाई रमल्या ‘तुझ्यात जीव रंगला’च्या आठवणीत, अक्षयाने शेअर केला ‘Nostalgia’ व्हिडीओ

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख. राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.

Video | पाठक बाई रमल्या ‘तुझ्यात जीव रंगला’च्या आठवणीत, अक्षयाने शेअर केला ‘Nostalgia’ व्हिडीओ
अक्षय देवधर
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 2:09 PM

मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतील अंजलीच्या भूमिकेमुळे अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) घराघरात पोहोचली. खरं तर अंजलीपेक्षा ‘पाठकबाई’ हीच तिला मिळालेली खरी ओळख. राणादासोबत तिची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अगदी काहीच महिन्यांपूर्वी ही मालिका ऑफ एअर गेली आहे. मात्र, तरीही चाहत्यांच्या मनातील ‘अंजली बाई’ आणि ‘राणा दा’ यांच्याबद्दलचे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही. मालिका ऑफ एअर गेल्यानंतर ‘अंजली बाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर फिटनेसकडे वळली. सध्या तिचे सोशल मीडियावरील काही व्हिडीओ खूप चर्चेत आहेत. नुकत्याच तिने ‘तुझ्यात जीव रंगला’च्या आठवणी शेअर केल्या आहेत (Akshaya Deodhar share Nostalgia memories of  Tujhyat Jeev Rangala serial).

मालिका सध्या ऑफ एअर गेली असली तरी प्रेक्षक आपल्या आवडत्या कलाकारांना खूप मिस करत आहेत. मालिका आता सुरु नसली, तरी मालिकेतील कलाकार देखील या मालिकेच्या गोड आठवणीत रममाण झालेले दिसत आहेत. ‘पाठक बाई’ अर्थात अभिनेत्री अक्षया देवधरने मालिकेच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

सोशल मीडियावर सक्रिय अक्षया

अक्षया देवधर सोशल मीडियावर अत्यंत सक्रिय असते. ती तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सतत चाहत्यांसोबत शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता आणि तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल चाहत्यांना थोडीशी कल्पना दिली होती (Akshaya Deodhar share Nostalgia memories of  Tujhyat Jeev Rangala serial).

हम है नये अंदाज क्यू हो पुराना?

मालिका ऑफ एअर गेल्यानंतर अक्षयला कामातून उसंत मिळाली आहे. दरम्यान, तिने तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. सध्या ती तिच्या मैत्रिणींबरोबर धमाल करताना दिसते. असाच मैत्रिणींसोबतचा एक व्हिडीओ अक्षयाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये ती मैत्रीणींसोबत ‘हम है नये, अंदाज क्यू हो पुराना? या गाण्यावर नाचताना दिसली होती.

अक्षया सध्या स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देत असून, जिम ट्रेनिंग आणि व्यायामाचे फोटो-व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. इतकेच नव्हे तर या दरम्यान तिने तिच्या जुन्या मित्र-मैत्रिणींच्या भेटी घेण्यासही सुरुवात केली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात अक्षयाने आपल्या ‘तुझ्यात जीव रंगला’च्या टीमसोबत हजेरी लावली होती. यावेळी शिमरी साडी, डार्क मेकअप, डायमंड नेकलेस असा अक्षयचा ग्लॅमरस लूक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता.

(Akshaya Deodhar share Nostalgia memories of  Tujhyat Jeev Rangala serial)

हेही वाचा :

कोरोना काळात सिने कर्मचाऱ्यांना ‘यशराज फिल्म्स’चा मदतीचा हात, 30 हजार लोकांसाठी मोफत लसीकरणाची व्यवस्था!

Aggabai Sunbai | सोहमच्या प्रतारणेमुळे आत्महत्या करणाऱ्या ‘शुभ्रा’च्या आयुष्यात येणार एक नवी व्यक्ती! 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.