AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani | आलिया – रणवीर यांची ‘फ्लॉप लव्हस्टोरी’, ट्रेलरवर चाहत्यांची नाराजी

'ना क्लास, ना एज्युकेशन तुम इस लकडे के साथ...', 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, आलिया - रणवीर यांची केमिस्ट्री पाहून चाहते नाराज

Rocky Aur Rani Kii Prem Kahaani | आलिया - रणवीर यांची 'फ्लॉप लव्हस्टोरी', ट्रेलरवर चाहत्यांची नाराजी
| Updated on: Jul 04, 2023 | 3:06 PM
Share

मुंबई | भिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग स्टारर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ (Rocky Aur Rani Kii Prem Kahaani) सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. पण सिनेमाचा ट्रेलर काही प्रेक्षकांना आवडला आहे, तर काहींनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. आलिया भट्ट हिने इन्स्टाग्रावर ट्रेलर पोस्ट केला आहे. सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी रणवीर याला ट्रोल केलं आहे तर, आलिया हिने सिनेमात ओव्हर ऍक्टिंग केली असल्याची प्रतिक्रिया चाहत्यांकडून येत आहे सध्या सर्वत्र आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या ट्रेलरची चर्चा रंगत आहे. एवढंच नाही तर सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय सिनेमा फ्लॉप जाईल अशी भविष्यवाणी देखील केली आहे.

सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर आलिया आणि रणवीर यांच्यातील फरक लक्षात येत आहे. शिवाय, दोघांची लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचेल का? घरचे त्यांच्या नात्याला स्वीकारतील का? सिनेमात आलिया आणि रणवीर यांची प्रेम कहाणी अधुरी राहणार तर नाही ना? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडत आहेत. पण सिनेमात नक्की काय घडेल.. हे सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt  (@aliaabhatt)

‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या ट्रेलरमध्ये फक्त आलिया भट्ट आणि अभिनेता रणवीर सिंग यांच्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. शिवाय अभिनेत्री जया बच्चन आणि अभिनेते धर्मेंद्र ट्रेलरमध्ये फार कमी क्षणासाठी दिसत आहेत. पण धर्मेंद्र यांच्या एका डायलॉगमुळे ट्रेलर चर्चेत आहे… ‘घर तोडा नही करते…’ असं धर्मेंद्र आलिया हिला सांगताना दिसत आहेत.

सिनेमा २८ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. सिनेमात आलिया, रणवीर यांच्यासोबत जया बच्चन, धर्मेंद्र, शबाना आझमी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘रॉकी और राणी की प्रेम कहाणी’ सिनेमाच्या माध्यमातून दिग्दर्शक करण जोहर तब्बल सात वर्षांनंतर दिग्दर्शन क्षेत्रात पदारर्पण करत आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमा बॉक्स ऑफिसवर कशी कमाई करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

‘गली बॉय’ सिनेमाच्या यशानंतर रणवीर सिंग आणि आलिया भट्ट एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसत आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ सिनेमातून प्रेक्षकांनी आलिया आणि रणवीर यांच्यातील खास केमिस्ट्री अनुभवता येणार आहे.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.