AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: अशी असावी सासू, असा असावा मेव्हुणा! रणवीरला सासूकडून 2.5 कोटींचे घड्याळ तर मेव्हुण्याकडून 1 लाखाचा लिफाफा गिफ्ट

बहुप्रतीक्षित आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची जोरदार चर्चा होती. 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला.

Alia Bhatt Ranbir Kapoor Wedding: अशी असावी सासू, असा असावा मेव्हुणा! रणवीरला सासूकडून 2.5 कोटींचे घड्याळ तर मेव्हुण्याकडून 1 लाखाचा लिफाफा गिफ्ट
Soni Razdan Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 11:43 AM
Share

मुंबई : बहुप्रतीक्षित आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लग्नाची जोरदार चर्चा होती. 14 एप्रिलला काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा (Alia bhatt Ranbir Kapoor Wedding ) थाटात पार पडला. या लग्नाला काही मोजक्या बॉलिवूड कलाकारांनीही हजेरी लावली होती. आलिया आणि रणबीरची एक झलक पाहण्यासठी लोक उत्सुक होते. त्यांनतर या दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो समोर आले आहेत.आलियाचं मंगळसूत्र आणि अंगठीनंतर आता रणबीरला त्याच्या सासूकडून खास भेटवस्तू मिळाल्याची माहिती समोर आली आहे.यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर येत आहेत. 5 वर्षाच्या रिलेशनशिपनंतर या पॉवर कपलच्या लग्नातली प्रत्येक विधी खूप खास होती.

View this post on Instagram

A post shared by Alia Bhatt ?☀️ (@aliaabhatt)

सोशल मीडियावर स्क्रोल केल्यावर सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या लग्नाचेच फोटो पहायला मिळत आहेत. रणबीर-आलियाने 14 एप्रिल रोजी ‘वास्तू’ या बंगल्यात लग्नगाठ बांधली. लग्नाला त्यांचे मोजकेच जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. या दोघांवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय.

या लग्नात चपला चोरीचा विधी देखील पार पाडला. आलिया भट्टच्या गर्ल गँगने तिच्या मेव्हण्याकडून बूट चोरण्यासाठी 11.5 कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, बराच वेळ हशा आणि वादविवादानंतर त्यांना 1 लाख रुपये देण्यात आल्याचे वृत्त आहे. आलियाला कपूर कुटुंबाकडून एक दुर्मिळ हिऱ्याची अंगठी मिळाली, तर हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार रणबीरला त्याची सासू सोनी राजदान यांनी भेट दिलेले घड्याळ मिळाले. या घड्याळाची किंमत अडीच कोटी रुपये आहे.

गेल्या महिन्याभरापासून कलाविश्वात आलिया आणि रणबीरच्या लग्नाची चर्चा रंगत होती. अखेर गुरुवारी (14 एप्रिल) संध्याकाळी हे दोघं लग्नबंधनात अडकले. रणबीर कपूरच्या मुंबईतील ‘वास्तू’ या बंगल्यात हा लग्नसोहळा पार पडला. यावेळी कपूर आणि भट्ट कुटुंबातील मोजके पाहुणे आणि बॉलिवूडमधील काही तारे-तारका उपस्थित होते. बुधवारी 13 एप्रिल रोजी रणबीर-आलियाचा मेहंदीचा कार्यक्रम पार पडला होता.

हेही वाचा:

Chirag Patil: सेटवरच्या जेवणाविषयी चिरागने लढवली शक्कल; पाच दिवसांत बदलल्या क्रू मेंबर्सच्या सवयी

Ranbir Alia Wedding: हे असं लग्न लावणं चेष्टा नाय, मंडळी! धाडस लागतं.. धाडस

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.