Release date | अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट ‘या’ तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला!

दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा आगामी 'पुष्पा' (Pushpa) चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे.

Release date | अल्लू अर्जुनचा पुष्पा चित्रपट 'या' तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांचा आगामी ‘पुष्पा’ (Pushpa) चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात होते. शेवटी आज या चित्रपटाची रिलीजची तारीख जाहिर करण्यात आली आहे. हा चित्रपट 13 ऑगस्टला चित्रपटगृहामध्ये रिलीज होणार आहे. सुकुमार हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि लेखक आहेत. हा चित्रपट तेलगू, तामिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होईल.अल्लू अर्जुनचा मागील चित्रपट ‘अला वैकुंठपुरूमूलो ’ नेटफ्लिक्सवरही आणि बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. (Allu Arjun’s ‘Pushpa’ movie will be released on August 13)

हा चित्रपट 2020 मधील सर्वात मोठ्या म्हणून हिट झाला. आता पुष्पा या बहुप्रतिक्षित चित्रपटाची तारीख जाहीर केली असून, चित्रपटगृहात रिलीज केला जात आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन व्यतिरिक्त रश्मिका मंदाना, धनंजय आणि सुनील दिसणार आहेत. निर्माते नवीन यार्नेनी आणि रविशंकर याबाबत म्हणतात की, “पुष्पाच्या रिलीजची तारीख जाहीर करण्यात आम्हाला आनंद झाला. पॅन इंडिया प्रेक्षकांना ध्यानात ठेवून आम्ही हा अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपट बनविला आहे. जेणेकरून सर्व प्रेक्षकांना त्याचा आनंद लुटता येईल.

दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुन याने 1 नाही, 2 नाही, तर तब्बल 7 कोटी रुपयांची कार खरेदी केली आहे. या कारचे काही फोटोही त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याच्या या नव्या कारमुळे अल्लू अर्जून चर्चेत आला होता. सलमान खान, अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमारसारखे बडे स्टार बॉलिवूडमध्ये असूनही कुणी इतकी महागडी कार खरेदी केलेली नाही. देशातील सर्वात महागडी कार खरेदी करणारा पहिला अभिनेता म्हणून अल्लू अर्जुन आहे, असं म्हटलं जात होत. अल्लू अर्जूनने ‘पेरु सुर्या’ आणि ‘ना इल्लू इंडिया’ चित्रपटात काम केले होते. यामध्ये त्याने एका सैन्याच्या अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

संबंधित बातम्या : 

Tandav | ‘तांडव’च्या टीमला दिलासा नाहीच, नाराज ऋचा चड्ढाचा कोर्टाच्या निर्णयावर सवाल!

Confirmed | मार्च महिन्यात नाही तर ‘या’ महिन्यात करिना सैफच्या घरी येणार नवा पाहुणा!

Congratulations | शिल्पा रावची मित्रासोबत लगीनगाठ, लग्नानंतरचा पहिला फोटो शेअर!

(Allu Arjun’s ‘Pushpa’ movie will be released on August 13)

Published On - 5:20 pm, Thu, 28 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI