AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amala Paul: न्यूड सीनमुळे चर्चेत आलेल्या ‘या’ अभिनेत्रीने अखेर सांगितलं ब्रेक घेण्यामागचं कारण

अखेर 2021 मध्ये 'कुट्टी स्टोरी' आणि 'पिट्टा कथलू' या चित्रपटांमधून तिने पुनरागमन केलं. 'रंजीश ही सही' या हिंदी सीरिजमध्येही ती झळकली. आमला तिच्या न्यूड सीनमुळेही प्रचंड चर्चेत आली होती.

Amala Paul: न्यूड सीनमुळे चर्चेत आलेल्या 'या' अभिनेत्रीने अखेर सांगितलं ब्रेक घेण्यामागचं कारण
अभिनेत्रीने अचानक घेतला चित्रपटसृष्टीतून ब्रेकImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Sep 11, 2022 | 8:33 PM
Share

अभिनेत्री आमला पॉलने (Amala Paul) 2019 मध्ये चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतल्याचा निर्णय घेत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. त्यावेळी ती करिअरच्या शिखरावर होती. तिची मुख्य भूमिका असलेला आदई हा चित्रपट त्याच वर्षी प्रदर्शित झाला होता आणि त्यापूर्वी ती आणखी दोन चित्रपटांमध्ये झळकली होती. असं असूनही तिने ब्रेक (sabbatical) घेत 2021 मध्ये पुनरागमन केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ब्रेक घेण्यामागचं कारण सांगितलं.

आमलाने वयाच्या 17 व्या वर्षी नीलतमरा या मल्याळम चित्रपटातून पदार्पण केलं होतं. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या मायना या तमिळ चित्रपटातून तिला प्रसिद्धी मिळाली. त्यानंतरच्या दहा वर्षांत तिने 32 चित्रपटांमध्ये काम केलं आणि 2019 मध्ये ब्रेक घेतला.

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत आमला म्हणाली, “माझे चित्रपट चालत नाहीत किंवा मला ऑफर्स येत नाहीत म्हणून मी ब्रेक घेतला नव्हता. उलट त्यावेळी मला माझ्या करिअरमधील सर्वांत मोठी ऑफर मिळाली होती. पण मी नकार दिला. कारण मला फक्त ब्रेक हवा होता. मी खूप थकले होते, माझ्यात काम करण्याचा त्राणच उरला नव्हता. वयाच्या 17व्या वर्षी मी कामाला सुरुवात केली आणि आता मी 30 वर्षांची आहे. सलग 13 वर्षे मी ब्रेक न घेता काम केलं. त्यादरम्यान मी माझ्या बाबांना गमावलं, कोरोना महामारीचा काळ गेला. इंडस्ट्रीत काम करून मी खूश नव्हते. मला ब्रेकची खूप गरज होती.”

View this post on Instagram

A post shared by Amala Paul (@amalapaul)

अखेर 2021 मध्ये ‘कुट्टी स्टोरी’ आणि ‘पिट्टा कथलू’ या चित्रपटांमधून तिने पुनरागमन केलं. याशिवाय तिने ओटीटीवरही पदार्पण केलं. ‘रंजीश ही सही’ या हिंदी सीरिजमध्येही ती झळकली. आमला तिच्या न्यूड सीनमुळेही प्रचंड चर्चेत आली होती.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.