भजन, आरती, हवन; अंबानी कुटुंबाने गंगा काठावर चक्क मृत पाळीव कुत्र्यासाठी घातली मोठी पूजा
अंबानी कुटुंबाची चर्चा कधी कोणत्या कारणाने होईल हे काही सांगता यायचे नाही. आताही हे कुटुंब चर्चेत आलं आहे ते म्हणजे त्यांनी ठेवेलल्या एका पूजेमुळे जी त्यांनी त्यांच्या पाळीव कुत्र्याच्या निधनानंतर ठेवली. पाळीव कुत्र्याच्या स्मरणार्थ गंगा नदीकाठावर पूजा आयोजित करण्यात आली होती. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचे संपूर्ण कुटुंब नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतं. विशेषतः अंबानी महिलांची तर खूप चर्चा होत असते. मग तो कोणताही कार्यक्रम असो किंवा लग्न असो. अंबानी कुटुंबातील महिलांचे साडीपासूनते ते त्यांनी घातलेल्या दागिन्यांपर्यंत सर्वांची चर्चा होत असते.
लाडका पाळीव कुत्रा हॅपीच्या निधनानंतर खास पूजा
आताही अंबानी कुटुंब अशाच एका कारणाने चर्चेत आलं आहे. अंबानी कुटुंबाने त्यांच्या पाळीव कुत्र्यासाठी चक्क गंगा काठावर एक मोठी पूजा आयोजित केली होती. 30 एप्रिल 2025 रोजी कुटुंबाने आपला खास सदस्य गमावला. तो म्हणजे त्यांचा पाळीव कुत्रा ज्याचं नाव होतं हॅपी. हॅपीच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबाला खूप दुःख झाले. प्रेमळ आणि लाडका पाळीव कुत्रा हॅपी संपूर्ण कुटुंबाचा आवडता होता. मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांशी त्याचे एक खास नाते होते. तो अनंत अंबानींचा फार लाडका होता. आता अंबानी कुटुंबाने त्यांच्या प्रिय हॅपीसाठी एक खास पूजा आयोजित केली आणि या पूजेमध्ये अंबानी कुटुंबातील बहुतेक सदस्य उपस्थित होते. या पूजा सोहळ्याचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. जे सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.
गंगा काठावर कुटुंबाने आयोजित केली खास पूजा
खरं तर, हॅपीच्या मृत्यूच्या पाच दिवसांनंतर, अंबानी कुटुंबातील सदस्य आकाश अंबानी, श्लोका अंबानी, राधिका मर्चंट आणि अनंत अंबानी यांनी या खास पूजेला हजेरी लावली. त्यांच्यासोबत कुटुंबातील मुले पृथ्वी आणि वेद देखील दिसले. ऋषिकेशमधील गंगा नदीच्या काठावर ही विशेष पूजा करण्यात आली. परमार्थ निकेतन आश्रमाबाहेर संपूर्ण कुटुंब एकत्र हवन आणि पूजा करताना दिसले. यावेळी लहान मुलांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला. राधिका मर्चंट आणि श्लोका मेहता देखील भजन आणि आरतीमध्ये हरवून गेल्याचे दिसून आले. याशिवाय कुटुंबाने गंगेत स्नानही केले. हा पूजा कार्यक्रम परमार्थ आश्रमानेच आयोजित केला होता.
View this post on Instagram
कुटुंबाचा लूक कसा होता?
आकाश अंबानी आणि अनंत अंबानी दोघेही कुर्ता पायजमा परिधान केलेले दिसले. मोठी सून श्लोका मेहतानेही पिवळ्या-केशरी रंगाचा सूट घातला होता आणि राधिका मर्चंट हलक्या रंगाच्या सूटमध्ये दिसली. ती पृथ्वी आणि वेद या दोन्ही मुलांची काळजी घेत असल्याचे दिसून आले. याशिवाय, दोघीही भजन गुणगुणतानाही व्हिडीओमध्ये दिसत आहेत.
नीता अंबानी, मुकेश अंबानी, ईशा अंबानी आणि आनंद पिरामल हे त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या खास पूजेला उपस्थित राहू शकले नाहीत. याआधी त्यांच्या घरी हॅपीच्या अंतिम निरोपासाठी एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिथे हॅपीला श्रंद्धांजली वाहण्यात आली होती तसेच त्याच्यासाठी एक खास संदेशही लिहिण्यात आला होता.
अनंतच्या लग्नात दिसला होता हॅपी
हॅप्पी अंबानी कुटुंबाचा एक महत्वाचा भाग होता. हॅपीने कुटुंबाला अनेक संस्मरणीय आणि खास क्षण दिले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या साखरपुड्यात आणि लग्नात त्याची खास उपस्थिती दिसून आली. हॅपीचे डिझायनर कपड्यांमधील फोटो व्हायरल झाले होते.
