फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणार, नवा प्लॅन काय? अमित देशमुख म्हणतात…

येणाऱ्या काळात फिल्मसिटीमध्ये चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा फिल्मसिटीमार्फत तयार करण्यात यावा असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

फिल्मसिटीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देणार, नवा प्लॅन काय? अमित देशमुख म्हणतात...
आराखडा तयार करण्याचे अमित देशमुखांचे आदेश
Follow us
| Updated on: Jan 20, 2022 | 7:05 PM

मुंबई ​: गोरेगाव येथील फिल्मसिटीमध्ये मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात फिल्मसिटीमध्ये चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा फिल्मसिटीमार्फत तयार करण्यात यावा असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले. आज फिल्मसिटी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, सहव्यववस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टुडिओ निर्माण करणार

अमित देशमुख म्हणाले की, फिल्मसिटीमध्ये चित्रपट निर्मात्यांसाठी चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या प्रक्रियेकरिता (Pre Production and Post Production) एका ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी फिल्मसिटीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टुडिओ निर्माण करणे आवश्यक आहे. फिल्मसिटीमध्ये हे सर्व एकाच ठिकाणी कसे करता येऊ शकेल याबाबत दोन कंपन्यांनी यावेळी सादरीकरण केले. या कंपनीने सादर केलेल्या सादरीकरणानंतर यातील बाबींचा विचार करुन फिल्मसिटीमध्ये सुसज्ज आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओ उभारण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात यावा, असे आदेश देशमुख यांच्याकडून देण्यात आलेत.

हैदराबादमधील प्रसिद्ध रामोजी राव फिल्म सिटी ही भारतातली सर्वात मोठी फिल्मसिटी मानली जाते, बाहुबली या चित्रपटाचे शुटिंगही तिथेच झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत येत नोएडा येथील फिल्म सिटीला कलाकारांनी पाठिंबा द्यावा, ही फिल्मसिटी जागतिक दर्जाची फिल्मसिटी बनवू अशी घोषणा केली होती. मात्र भारतीय चित्रपट सृष्टीचे हब हे मुंबईला मानलं जातं. त्यामुळे मुंबईतील फिल्मसीटीचा दर्जा आणखी सुधारण्यासाठी काही मोठे निर्णय घेण्यात येत आहेत.

School reopen : राज्यातील शाळा 24 जानेवारीपासून सुरु; विचार न करता राज्य सरकारचा निर्णय? पुणे, औरंगाबादेतील शाळांचं काय?

‘हां मैने गांधी का वध किया’, नेहमी छत्रपतींची भूमिका साकारणाऱ्या कोल्हेंच्या ‘नथूराम गोडसे’त नेमकं काय आहे?

IND vs SA, 2nd ODI: संघात स्थान मिळवण्यासाठी दोन मुंबईकरांमध्ये स्पर्धा, असा असू शकतो भारतीय संघ

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.