Amitabh Bachchan : उद्या हे दिवे दुसऱ्यांना प्रकाश देतील… शेवटचा निरोप देताना बिग बी भावूक… सर्वांच्याच डोळ्यात आलं पाणी
Amitabh Bachchan : महानायक अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये प्रेक्षकांना निरोप देत असताना बिग बी भावूक झाले... बिग बी भावूक झाल्याचं पाहिल्यानंतर सर्वांच्याच डोळ्यात पाणी आलं.

‘कौन बनेगा करोडपती’ शोचा 17 वा सीझन लवकरच प्रेक्षांचा निरोप घेणारआ आहे. शनिवारी रात्री सीझनचा शेवटचा एपिसोड प्रदर्शित होणार आहे. अशात प्रेक्षकांचा आणि शोचा निरोप घेताना महानायक अमिताभ बच्चन भावूक झाले. यावेळी बिग बींच्या डोळ्यात पाणी देखील आलं. फिनालेच्या पूर्वी एका प्रोमो व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. प्रोमोमध्ये जुन्या आठवणी देखील ताज्या करण्यात आल्या… व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी लाईक्स आणि कमेंट करत प्रतिक्रिया देखील दिल्या.
शेवटच्या भागात, अमिताभ बच्चन एक प्रभावी भाषण देताना दिसतील ज्यामुळे त्यांचे डोळे पाणावतील आणि गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या अढळ प्रेमाबद्दल ते त्यांचे आभार मानतील या एपिसोडमध्ये अनेक खास क्षण दाखवण्यात येणार आहेत… ज्यामध्ये बिग बी गाणं गातील आणि किकू शारदा सर्वांना पोट धरुन हसवेल…
सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, अमिताभ बच्चन शेवटच्या भागात हॉट सीटवर बसून प्रेक्षकांशी बोलत असल्याचं दिसत आहेत. भावनिक होऊन, त्यांनी क्विझ शोशी दीर्घकाळ सहकार्य करणाऱ्या प्रेक्षकांचे आभार मानले.
भावूक होत बिग बी म्हणाले, ‘कधी – कधी आपण एखादा क्षण मोठ्या आनंदाने जगत असतो आणि त्यामध्ये हरवून जातो… पण जेव्हा तो क्षण अंतिम टप्प्यात येतो, तेव्हा असं वाटतं की, अरे आताच तर सुरुवात झाली होती आणि इतक्या लवकर संपलं देखील… असं वाटतं की, ही तर कालचीच गोष्ट आहे… मी या खेळाच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात करणार आहे. माझ्या आयुष्यातील एक तृतीयांश, खरं तर एक तृतीयांशपेक्षा जास्त काळ तुम्हा सर्वांसोबत घालवणं हे माझ्यासाठी भाग्य आहे.’
पुढे बिग बी म्हणाले, ‘जेव्हा जेव्हा मी म्हणालो की, मी येत आहे. तुम्ही सर्वांनी मोठ्या मनाने माझं स्वागत केलं… जेव्हा मी हसलो तेव्हा तुम्ही माझ्यासोबत हसलात आणि जेव्हा मी भावूक झालो तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलं… सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही या प्रवासात माझ्या सोबत राहिलात. आता उद्या हे दिवे दुसऱ्यांना प्रकाश देतील. मी फक्त एवढंच म्हणू शकतो: जर तुम्ही इथे असाल तर हा खेळ अस्तित्वात आहे आणि जर हा खेळ अस्तित्वात असेल तर आम्ही अस्तित्वात आहोत. खूप खूप धन्यवाद. ‘ सध्या बिग बींचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
