रेखा, जया नव्हे तर एका मुलीच्या प्रेमात वेडे होते अमिताभ बच्चन, कोण आलं आडवं?
बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांन मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला असून अनेक हीट चित्रपट त्यांनी बॉलिवूडला दिली आहेत. अमिताभ बच्चन यांचे फक्त चित्रपटच नाही तर त्यांचे खासगी आयुष्यही गाजले आहे. रेखा आणि त्यांच्या अनेक स्टोरी आजही चर्चेत आहेत.

मेगास्टार अमिताभ बच्चन हे त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल कायमच चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांचे चित्रपट धमाका करताना दिसतात. एक मोठा काळ त्यांनी बॉलिवूडमध्ये गाजवलाय. अमिताभ बच्चन यांचे प्रेमकरण देखील तेवढीच चर्चेत राहिलेली आहेत. जया बच्चन यांच्यासोबत जरी अमिताभ बच्चन यांचे लग्न झाले असले तरीही त्यांचे आणि अभिनेत्री रेखाचे अनेक किस्से आहेत. हेच नाही तर अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बाथरूममध्ये लपून बसण्याची वेळ रेखावर आली होती.
रेखा आणि जया बच्चन यांच्या अगोदर अमिताभ बच्चन एका मुलीच्या प्रेमात होते. मात्र, त्यानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. आज अमिताभ बच्चन यांच्या याच खास लव्ह स्टोरीबद्दल आज आपण बोलणार आहोत. ज्यावेळी अमिताभ बच्चन यांचे हे अफेअर सुरू होते, त्यावेळी ते कोलकत्ता येथे 200 ते 300 रूपयांची नोकरी करत होते. अभिनेता बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यानंतर ते कोलकत्ताहून मुंबईत दाखल झाले.
हनीफ झवेरी यांनी ‘मेरी सहेली पॉडकास्ट’ मध्ये अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या प्रेयसीबद्दल खुलासा केला. अमिताभ बच्चन यांच्या पहिल्या प्रियसीचे नाव माया होते. ती ब्रिटिश एअरवेजमध्ये फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करते. विशेष म्हणजे ती दिसण्यासही अत्यंत बोल्ड होती. अमिताभ बच्चन हे अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आल्यानंतर ती अनेकदा त्यांना भेटण्यासाठी मुंबईत येत. अमिताभ बच्चन आणि माया दोघे एकमेकांवर खूप जास्त प्रेम करत. दोघे एकमेकांना अधिक वेळ देण्यासाठी प्रयत्न करत.
अमिताभ बच्चन यांना वाटत होते की, त्यांची आई किंवा कुटुंबियांना मायासोबत असलेले नाते कळू नये. मुंबईत ते त्यांच्या आई तेजी बच्चन यांच्या ओळखीच्या व्यक्तीच्या बंगल्यात राहत होते. माया त्याच ठिकाणी भेटण्यासाठी अमिताभ बच्चनकडे जात. यानंतर भितीनेच अमिताभ बच्चन यांनी तो बंगला सोडला. ज्यावेळी मायासोबत अफेअर सुरूवात होते त्यावेळी अमिताभ बच्चन हे ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटाक काम करते होते.
अमिताभ बच्चन हे मुंबईला आल्यानंतर माया आणि त्यांच्यातील प्रेम अधिकच वाढले. पण अनवर अली यांनी अमिताभ बच्चन यांना मायासोबतचे नाते तोडण्याचा सल्ला दिला होता. माया खूप जास्त बोल्ड असल्याने ती बच्चन कुटुंबात व्यवस्थित राहणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी मायापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आणि काही दिवसांमध्येच दोघांचे ब्रेकअप झाले.
