AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amitabh Bachchan : अभिषेकची ती सवय विचित्र… बिग बींनीचं सांगितलं मुलाचं सीक्रेट

'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी आपला मुलगा अभिषेक बच्चनच्या एका विचित्र सवयीचा मजेशीर किस्सा सांगितला.

Amitabh Bachchan : अभिषेकची ती सवय विचित्र... बिग बींनीचं सांगितलं मुलाचं सीक्रेट
Big B revealed secret of Abhishek Bachchan
| Updated on: Aug 31, 2026 | 5:49 PM
Share

बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे लाखो चाहते आहेत. पण चाहत्यांना फक्त अमिताभ यांचा अभिनयच आवडत नाही, तर त्यांच्या सवयी, त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से, कुटुंबातील गमती-जमती याबद्दलही जाणून घेण्यास चाहते खूप उत्सुक असतात. अमिताभ आणि त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) दोघेही फिल्म इंडस्ट्रीतील. आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेऊन अभिषेकही याच क्षेत्रात आला, ते अनेकदा चित्रपटातही एकत्र दिसले. पण त्या दोघांचं नातं फक्त पिता-पुत्र यापुरत मर्यादित नाही तर ते एकमेकांचे चांगले मित्र देखील आहेत.अनेकदा अमिताभ बच्चन हे अभिषेकबद्दल काही ना काही सांगत असतात. ‘कौन बनेगा करोडपती’ हा त्यांचा शो पुन्हा सुरू झाला असून, नुकतंच त्यांनी या शोमध्ये अभिषेकबद्दल फारश माहित नसलेली गोष्ट सर्वांसमोर उघड केली. त्याचा हा किस्सा ऐकून प्रेक्षक अवाक् झाले तर काहींना त्यांचं हसूच आवरेना.

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये आलेल्या एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधतानाच त्यांचं आणि अभिषेकचं नातं हाँ विषय काढला. लाडक्या मुलाबद्दल बिग बी मोकळेपणाने बोलले, पण याचेवळी त्यांनी अभिषेकची पलखोल करत त्याच्या एका विचित्र सवयीबद्दलही सर्वांना सांगितलं. अमिताभ यांनी अतिशय मजेशीर अंदाजात अभिषेकची विचित्र सवय सांगितली, ते ऐकून उपस्थितांनाही हसू आवरेनासं झालं.

अभिषेकला विचित्र सवय.. काय म्हणाले बिग बी ?

केबीसी शो दरम्यान एका स्पर्धकाने अमिताभ यांना म्हटलं की तुमचं , तुमच्या मुलाशी अगदी मैत्रीचं नातं आहे ना.. ते ऐकून अमिताभ म्हणाले, ‘ मी अभिषेकला माझा चांगला मित्र मानतो, पण त्याची एक विचित्र सवय आहे, ती म्हणजे को कधीच फळं खात नाही. ‘

पुढे ते म्हणाले, ‘ कुटुंबातील र्व सदस्य फळं खातात, पण अभिषेकच्या बाबतीत तसं नाही. तसंच जर एखादा दुधाचा पदार्थ असेल, तर तो खाण्यासही अभिषेक फार उत्सुक नसतो, पण फळं.. ? फळ खायला तर तो कधीच तयार नसतो ‘ असं म्हणत मजेशीर अंदाजात बिग बी यांनी आपल्या लाडक्या लेकाची तक्रार केली.

वडिलांच्या कवितेमुळे झाले भावूक

शोमध्ये बऱ्याच मजेशीर गप्पा झाल्या, त्यानंतर वातावरण थोडं इमोशनल झालं. त्याचं कारण म्हणजे, अमिताभ बच्चन यांना त्यांचे वडील, ज्येष्ठ कवी हरिवंश राय बच्चन यांची एक कविता आठवली. या कवितेमध्ये पिता-पुत्राचं नातं, वारसा आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाणाऱ्या विचारांची चर्चा करण्यात आली आहे. अमिताभ यांनी या कवितेचा उल्लेख केला.

आयएफएसमध्ये जायचं होतं स्वप्न

यापूर्वी शोच्या एका भागात अमिताभ यांनी त्यांच्या जुन्या स्वप्नाचा उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं, ‘एक काळ असा होता, जेव्हा माझ्या मनात आयएफएसमध्ये जाण्याचा विचार आला होता. मीही सिव्हिल सर्व्हिसची परीक्षा देऊन भारतीय परराष्ट्र सेवेत करिअर करण्याचा विचार केला होता. मात्र, त्यावेळी मला आयएफएसबद्दल फारशी माहिती नव्हती. मला त्यातील ‘आय’सुद्धा माहीत नव्हते. त्यामुळे मी हा विचार सोडून दिला ‘ असं बिग बी म्हणाले.

Follow Us
डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले..
CM Devendra Fadnavis | डिलिमिटेशन विधेयकाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, थेट म्हणाले...
मराठी मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे काय हेतू आहे?- दमानिया
मराठी सक्तीची मुदत थेट एका वर्षापर्यंत वाढवण्यामागे नेमका हेतु काय? अंजली दमानियांच्या वक्तव्याची तुफन चर्चा
माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल'- अमित ठाकरे
Amit Thackeray | 'माझ्यावर पहिला गुन्हा शिवरायांसाठी, दुसराही चालेल' अमित ठाकरेंचं विधान चर्चेत
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा...
एकीकडे मनोज जरांगेंचं उपोषण दुसरीकडे ओबीसींचा महाएल्गार मोर्चा, मुबईत मोठं घडणार?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत काय घडलं?
मोठी बातमी! अशोक खरातला जामीन मिळणार का? कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं? मोठी अपडेट समोर
जेवण केलं, ॲसिडिटीचा त्रास झाला अन् अचानक... आदिती तटकरेंच्या PRO सोबत नेमकं काय घडलं?
ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
Amit Thackeray | पुण्यातील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये अमित ठाकरेंचा आक्रमक पवित्रा, छत्रपती शिवरायांशेजारील मोदींचा फोटो हटवला
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील...
असं काही घडलं की प्रताप सरनाईक संतापलेच; थेट म्हणाले, केंद्रातील सूचनेनुसार...
39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
Pratap Sarnaik | 39 कोटींचं कलादालन 160 कोटींवर कसं?; मेहतांचा सवाल, सरनाईकांचा पलटवार
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला...
अमित ठाकरेंकडून पुण्यातील कॉलेजच्या दुरावस्थेची पाहणी; प्रशासनाला दिली आठवड्याची मुदत