AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सैफ अली खानच्या आयुष्यात पहिली पत्नी कायम…, करीना कपूरचं मोठं वक्तव्य

Kareena Kapoor - Saif Ali Khan : दुसऱ्या लग्नानंतर सैफ अली खान याच्या आयुष्या पहिली पत्नी कायम... करीना कपूरच्या वक्तव्यामुळे चाहते हैराण... करीना कायम तिच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दलच्या अनेक गोष्टी चाहत्यांना सांगत असते. सध्या सर्वत्र अभिनेत्रीची चर्चा...

सैफ अली खानच्या आयुष्यात पहिली पत्नी कायम..., करीना कपूरचं मोठं वक्तव्य
करीना कपूर, सैफ अली खान
| Updated on: May 31, 2024 | 2:00 PM
Share

अभिनेता सैफ अली खान कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सैफ याने फार कमी वयात अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत लग्न केलं. दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर आहे. सैफ आणि अमृता यांना दोन मुलं देखील आहेत. दोन मुलांच्या जन्मानंतर देखील अमृता – सैफ यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अमृता हिच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर सैफ याने अभिनेत्री करीना कपूर हिच्यासोबत लग्न केलं. करीना – सैफ यांच्या लग्नात अमृता उपस्थिती नव्हती पण तिने मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम यांना तयार करुन पाठवलं होतं.

एका मुलाखतीत करीना कपूर म्हणाली होती, मी कधीच अमृता हिला भेटली नाही. पण सिनेमांमुळे मी तिला ओळखते. मी अमृताची मोठी चाहती आहे… असं देखील बेबो म्हणाली होती. 2008 मध्ये ‘जब वी मेट’ सिनेमाच्या सक्सेसनंतर जेव्हा करीना हिने सैफ याच्यासोबत असलेल्या नात्यावर मोठी प्रतिक्रिया दिली होती.

‘मला लग्न करायचं आहे आणि मला मुलांना जन्म देखील द्यायचा आहे.. सैफसोबत असलेल्या नत्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. माझ्यासाठी वेळ प्रचंड महत्त्वाची आहे. मी कायम सैफ याच्यासोबत राहाणार आहे. मी सैफ याच्या पहिल्या पत्नीचा देखील आदर करते.’

‘सैफ विवाहित आणि दोन मुलांचा बाप आहे… याचा मी सन्मान करते. मी कधी अमृताला भेटली नाही. पण मी तिचा आदर करते. सैफच्या आयुष्यात अमृता हिचं स्थान कायम महत्त्वाचं असेल… कारण ती सैफची पहिली पत्नी आणि त्याच्या दोन मुलांची आई आहे…’

‘मी सैफला सांगितलं होतं की, अमृता हिला कायम सन्मान मिळायला हवा… माझ्या आई – वडिलांनी मला असंच सांगितलं आहे. ते फक्त एक लग्न होतं, जे फार काळ टिकू शकलं नाही…’ असं देखील करीना कपूर मुलाखतीत म्हणाली होती. सांगायचं झालं तर सावत्र मुलांसोबत देखील करीना हिचे चांगले संबंध आहेत.

अभिनेत्री अमृता सिंग हिच्यासोबत घटस्फोट झाल्याच्या अनेक वर्षांनंतर सैफने अभिनेत्री करीना हिच्यासोबत लग्न केलं. खास पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह सोहळा संपन्न झाला. सैफ आणि करीना यांना दोन मुलं आहे. तैमूर अली खान आणि जेह अली खान अशी दोघांच्या मुलांची नावे आहेत. सोशल मीडियावर करीनाची दोन्ही मुलांचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा