Anant-Radhika 2nd pre-wedding : 7000 कोटींची लग्जरी क्रूझ, ते 800 पाहुणे, आयुष्यभर नाही विसरणार अंबानींचा पाहुणचार
Anant-Radhika 2nd pre-wedding : 7000 कोटीची लग्जरी क्रूज, 800 पाहुण्यांना मिळणार आयुष्यभर न विसरता येणारा अनुभव, अनंत अंबानी - राधिका मर्चंट याचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा चार दिवसांचा असणार आहे... सध्या सर्वत्र सोहळ्याची चर्चा

आशियातील दिग्गज उद्योजक मुकेश अंबानी यांचा लहान मुलगा अनंत आणि होणारी सून राधिका यांचा दुसरा प्री-वेडिंग फंक्शन आजपासून म्हणजेच 28 मेपासून इटलीमध्ये सुरू होत आहे. प्रचंड भव्य आणि कधीही न विसरता येणारा हा प्री-वेडिंग फंक्शन असल्याचं देखील सांगण्यात येत आहे. राधिका – अनंत यांच्या पहिल्या प्री-वेडिंग फंक्शनने जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. आता दुसरं प्री-वेडिंग फंक्शन देखील त्यापेक्षा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनंत – राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची चर्चा सुरु आहे.
अनंत अंबानी यांचा दुसरा प्री-वेडिंग फंक्शन 7000 कोटी रुपयांच्या लक्झरी क्रूझवर होणार आहे. याशिवाय 800 व्हीव्हीआयपी पाहुने या सोहळ्यात सामील होण्याची शक्यता आहे. प्री-वेडिंग पार्टीला अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटी उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय स्टार शकीरा देखील अनंत अंबानी यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग फंक्शन सहभागी होऊ शकते. राधिका – अनंत यांचा दुसरा प्री-वेडिंग फंक्शन चार दिवसांचा असणार आहे. क्रूझ इटली आणि फ्रान्स दरम्यान 4,000 किलोमीटरहून अधिक प्रवास करेल. यावेळी पाहुण्यांना समुद्राच्या निर्मळ सौंदर्याचा अनुभव घेता येणार आहे.
अंबानी कुटुंबियांच्या पाहुण्यांच्या यादीत 800 जणांचा समावेश असल्याची माहिती आहे. त्यात बॉलीवूड सेलिब्रिटी, बिझनेस टायकून आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांचा समावेश असेल. यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, रणवीर सिंग, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट देखील असणार आहेत.
एवढंच नाहीतर, क्रुझमध्ये 600 पेक्षा अधिक कर्मचारी असणार आहेत. जे पाहूण्यांच्या सेवेसाठी हजर असतील. रिपोर्टनुसार, क्रुझची किंमत 7 हजार करोड रुपयांपेक्षा देखील अधिक आहे. सांगायचं झालं तर, जामनगर येथे झालेल्या पहिल्या प्री-वेडिंग सोहळ्यात अंबानी कुटुंबियांनी 1 हजार 259 कोटी रुपये खर्च केले होते. आता क्रुझवर होणारी पर्टी देखील महागडी असणार आहे.
क्रूझवर आज होणार ग्रँड वेलकम
अनंत अंबानी – राधिका मर्चंट याचा दुसरा प्री-वेडिंग सोहळा चार दिवसांचा असणार आहे. 28 मे रोजी पाहुण्याचं ग्रँड वेलकम होणार आहे. 29 मे रोजी वेलकम लंच थीमने पार्टीची सुरुवात होणार आहे. त्यानंतर रात्री ‘तारों वाली रात’, 30 मे रोजी ‘ए रोमन हॉलिडे’ थिम असणार आहे. ज्यासाठी टूरिस्ट चिक असा ड्रेस कोट असणार आहे.
त्यानंतर 30 मे रोजी रात्री ‘ला डोल्से फार निएंटे’ अशी थिम असणार आहे. त्यानंतर रात्री 1 वाजता टोगा पार्टी होणार आहे. अनंत अंबानी – राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री-वेडिंग सोहळ्यासाठी अनेक वेगवेगळ्या थिम ठरवण्यात आल्या आहेत. शनिवारी प्री-वेडिंग सोहळा संपणार आहे.
