AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईशा अंबानीच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीत किंग खानने हे काय केले?

आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांच्या जुळ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाला जंगी पार्टी झाली. त्यास बॉलीवूडच्या दुनियेतील अनेक तारे या पार्टीला हजर होते. या पार्टीत किंग खान शाहरुख याच्या उपस्थितीने चार चांद लावले. मात्र अचानक शाहरुखची फिरकी घेताना अंबानी पूत्र अनंत अंबानी या केलेल्या एका कृतीने सर्वांच्या भुवया उंचावल्या.

ईशा अंबानीच्या मुलांच्या बर्थ डे पार्टीत किंग खानने हे काय केले?
shahrukh khanImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 19, 2023 | 3:36 PM
Share

मुंबई | 19 नोव्हेंबर 2023 : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेले मुकेश अंबानी यांच्या कोणत्याही कौटुंबिक सोहळ्यात बॉलीवूडच्या चमचमत्या ताऱ्यांची नेहमी हजेरी असते. आता मुकेश आणि नीता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आणि जावई आनंद पिरामल यांनी काही दिवसांपूर्वी जंगी पार्टी आयोजित केली होती. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या जुळ्या मुलांच्या पहिल्या वाढदिवसाची ही पार्टी होती. कृष्णा आणि आदिया यांना एक वर्ष पूर्ण झाल्याने 18 नोव्हेंबरला ही पार्टी झाली. यावेळी अनेक बॉलीवूडच्या हस्ती हजर होत्या. बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानही यावेळी उपस्थित होता.

सोशल मिडीयावर शाहरुख खान फॅन या खात्यावरुन एक व्हिडीओ शेअर झाला आहे. या व्हिडीओत शाहरुख मुकेश अंबानीचे अनंत अंबानींसोबत पहायला मिळत आहेत. या व्हिडीओला खूप पाहीले जात आहे. कारण या व्हिडीओत अनंत अंबानी किंग खानच्या हातात अजगराचे पिल्लू देताना दिसत आहेत. परंतू किंग खान अजिबात विचलित न होता बिनधास्त पोझ देताना दिसत आहे. आरामात उभ्या असलेल्या किंग खानची छायाचित्र फोटोग्राफर काढीत आहेत.

येथे पाहा व्हिडीओ –

तेवढ्यात पाठीमागून आणखी एक साप किंग खानच्या गळ्यात अडकवताना दिसत आहे. परंतू तरीही खान चलबिचल न होता बिनधास्त पोझ देताना दिसत आहेत. हा किंग खानचा हा अंदाज पाहून त्याचे चाहते खूष झाले आहेत. किंग खान यांनी केस मानेपर्यंत वाढलेले असून त्यांनी काळा गॉगल लावला आहे. या पार्टीत कॅटरीना कैफ, करिश्मा कपूर, अनन्या पांडे, आदित्य रॉय कपूर आणि करण जोहर यांनी आपल्या दोन्ही मुलांसह सहभाग घेतला होता.

हे वर्षे चांगले गेले

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुखचा हा अंदाज त्याच्या फॅनला खूष करणार आहे. हे वर्ष शाहरुखला चांगले गेले आहे. आधी पठान ने छप्परफाड कमाई केली. त्यानंतर जवान ने बॉक्स ऑफीस झेंडे गाडले आहेत. शाहरुखने सलमान खानच्या टायगर -3 पाहूणा कलाकार म्हणून छोटी भूमिका केली आहे. त्याच्या हा रोलची खूप तारीफ केली जात आहे.

Follow Us
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना
सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक
Video : सोलापूरच्या उजनी धरणावर ४ मोठे प्रकल्प, १.६५ लाख कोटींची गुंतवणूक, विकासाला गती
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे उद्या घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर..
आरोपांनंतर मीनाक्षी शिंदे घेणार पत्रकार परिषद; प्रदीप पूर्णेकर प्रकरणात काय बोलणार?
दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन
Video : दुष्काळग्रस्तांना मदतीचा हात; १२५ नगरसेवकांकडून एक महिन्याचे मानधन, पाणी कपातीचे संकेत