Ananya Birla | अनन्या बिर्लाचे अमेरिकन रेस्टॉरंटवर गंभीर आरोप

कॅलिफोर्नियामधील एका सेलिब्रिटी शेफच्या रेस्टॉरंटमधून पॉप स्टार अनन्या बिर्ला आणि तिच्या कुटुंबीयांना बाहेर काढल्याचा आरोप अनन्या बिर्ला हीने केला आहे. वर्णद्वेषाचामुळेच बाहेर काढल्याचे अनन्या बिर्ला हीने म्हटले आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:10 PM, 27 Oct 2020
Ananya Birla | अनन्या बिर्लाचे अमेरिकन रेस्टॉरंटवर गंभीर आरोप

मुंबई : कॅलिफोर्नियामधील एका सेलिब्रिटी शेफच्या रेस्टॉरंटमधून पॉप स्टार अनन्या बिर्ला आणि तिच्या कुटुंबीयांना बाहेर काढल्याचा आरोप अनन्या बिर्ला हीने केला आहे. वर्णद्वेषाचामुळेच बाहेर काढल्याचे अनन्या बिर्ला हीने म्हटले आहे. मात्र, हा आरोप रेस्टॉरंटने फेटाळून लावत म्हटले की, आयडीवरून हा वाद निर्माण झाला होता आणि हा वाद तिथेच संपला देखील होता. अनन्या बिर्ला किंवा त्यांच्या कुटुंबीयांना रेस्टॉरंटमधून बाहेर काढल्याचा दावा त्यांनी फेटाळला आहे.(Ananya Birla serious allegations against an American restaurant)

अनन्या बिर्ला हिने शनिवारी या घडलेल्या घटने बद्दल ट्विट केले. या ट्विटमध्ये तिने म्हटले की, कॅलिफोर्नियामधील एका सेलिब्रिटी शेफच्या रेस्टॉरंटमधून माझ्या कुटुंबाला आणि मला वर्णद्वेषाचामुळे बाहेर काढले. घडलेल्या प्रकारानंतर मी खूप दु:खी आहे. आपल्या ग्राहकांशी असे वागणे योग्य नाही. अनन्या बिर्ला इथेच न थांबता पुढे अजून एक ट्विट करत म्हटले की, आम्हाला या रेस्टॉरंटमध्ये जेवण करण्यासाठी तब्बल तीन तास थांबावे लागले होते. सेलिब्रिटी शेफ अँटोनिया लोफासो यांना संबोधित करताना अनन्या बिर्ला म्हणते रेस्टॉरंटमधील एका वेटरने माझ्या आई सोबत अश्लील कृत्य केले आहे. त्यानंतर अनन्याचा भाऊ आर्यमान यांनेदेखील ट्विट करत, ‘वर्णद्वेष अस्तित्वात आहे, असे मला कधीही वाटले नव्हते. मात्र वर्णद्वेष कशाला म्हणतात, हे आज मला समजले आणि ते मी अनुभवले’, असे म्हटले आहे.

रेस्टॉरंटचे भागीदार पाब्लो मोक्स यांनी अनन्या बिर्ला आणि तिच्या कुटुंबीयांना रेस्टॉरंटमधून बाहेर काढले गेले नसल्याचा दावा केला आहे. रेस्टॉरंट कायद्यानुसार येथे मद्यपान करण्यासाठी आयडी असणे गरजेचा आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबापैकी केवळ दोन व्यक्तींकडेच आयडी होता. बाकींच्या व्यक्तींकडे आयडी कार्डच्या झेरॅाक्स प्रति असल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हा वाद मिटवण्यात आला होता. या वादानंतर अनन्या बिर्ला आणि त्यांच्या कुटुंबीयांनी रेस्टॉरंटमध्ये जेवण देखील केले. जेवणाचा दर्जा चांगला असल्याचा अभिप्रायदेखील त्यांनी दिला होता. त्यानंतर आता त्यांनी अशाप्रकारे बोलणे चुकीचे आहे. अनन्या बिर्ला यांनी आमच्या रेस्टॉरंटमध्ये परत एकदा जेवायला यावे, अशी आमची इच्छा आहे.

संबंधित बातम्या : 

रणवीर सिंहच्या एक्स गर्लफ्रेण्डसोबत डेटिंग, आदित्य रॉय कपूर म्हणतो…

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या घरी चिमुकलीचे आगमन!

(Ananya Birla serious allegations against an American restaurant)