मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या घरी चिमुकलीचे आगमन!

अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिचा नवरा राज कौशल हे चित्रपटातील अभिनय प्रमाणेच त्यांच्या फिटनेससाठी देखील ओळखले जातात. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 28 जुलै 2020 एका चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले आहे.

मंदिरा बेदी आणि राज कौशल यांच्या घरी चिमुकलीचे आगमन!

 मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी आणि तिचा नवरा राज कौशल हे चित्रपटातील अभिनय प्रमाणेच त्यांच्या फिटनेससाठी देखील ओळखले जातात. मंदिरा बेदी आणि राज कौशल यांनी 28 जुलै 2020 एका चार वर्षांच्या मुलीला दत्तक घेतले आहे. या बाबतची पोस्ट मंदिरा बेदी हिने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. मंदिराच्या या चिमुकलीचे नाव तारा आहे. सोशल मीडियावर आपल्या मुलीसह संपूर्ण कुटुंबाचा फोटो शेअर करून मंदिराने चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.(Chimukli Arrives Mandira Bedi And Raj Kaushal House)

यावेळी मंदिरा लिहतात की, आमची छोटी मुलगी तारा आमच्याकडे आशीर्वादासारखी आली आहे. वीरने आपल्या बहिणीचे स्वागत केले आहे. मंदिरा बेदी पुढे म्हणते तारा आमच्या कुटुंबाचा एक म्हत्वपूर्ण भाग आहे. मंदिराने शेअर केलेल्या फोटोमध्ये मंदिरा बेदी, राज कौशल, मुलगा वीर आणि मुलगी तारा दिसत आहे. मंदिरा बेदीने ही माहिती सोशल मीडियावर शेअर करताच सेलिब्रिटींच्या त्यावर प्रतिक्रिया येत आहेत. सेलिब्रिटीसह चाहत्यांनी मंदिरा बेदीचे अभिनंदन केले. एका अनाथ मुलीला दत्तक घेतल्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

अलिकडेच साहो चित्रपटात मंदिरा बेदीने केले होते काम
साहो या चित्रपटात प्रभास, श्रद्धा कपूर, यांच्यासह अभिनेता नितिन मुकेश, मंदिरा बेदी, जॅकी श्रॉफ, महेश मांजरेकर आणि चंकी पांडे यांनी काम केले. यूवी क्रियेशन प्रोडक्शन आणि टी-सिरिज मिळून हा चित्रपट तयार केला होता. तर या अॅक्शन थ्रिलर चित्रपट वामसी, प्रमोद आणि विक्रम यांनी मिळून निर्मिती केली होती. त्याचसोबत चित्रपटाचे दिग्दर्शन सुजीत यांनी केले होते.
जगभरात या चित्रपटाने 10 हजार स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित केला होता. भारतात हा चित्रपट 4500 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्यात आला. 350 कोटी रुपयांच्या बजेटचा हा चित्रपट आहे. पहिल्या दिवसात या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली. आंध्र प्रदेशात या चित्रपटाने 42 कोटी रुपयांची कमाई केली. तर तेलंगणामध्ये या चित्रपटाने 14.1 कोटी केली आहे. ‘बाहुबली 2’ ने देशभरात पहिल्या दिवशी 214 कोटी रुपयांची कमाई केली होती. पण ‘साहो’ला मात्र अपेक्षित यश मिळालेलं नव्हतं.

संबंधित बातम्या :

Saaho Review : समीक्षकांकडून दीड ते अडीच स्टार, प्रभासचे चाहते मात्र साहो पाहून खूश

“शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या दारी”, सोलापूर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा अनोखा उपक्रम

(Chimukli Arrives Mandira Bedi And Raj Kaushal House)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *