"शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या दारी", सोलापूर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा अनोखा उपक्रम

"शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या दारी" या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शिक्षक हे विध्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन स्वखर्चाने तयार केलेल्या नोट्स किंवा स्वाध्याय संच वाटप करून शैक्षणिक धडे देत आहेत. (Solapur Municipal Corporation Education board started initiative for inclusion of poor students in education)

"शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या दारी", सोलापूर महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा अनोखा उपक्रम

सोलापूर: कोरोना विषाणू प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील शाळांना टाळे लागले. ते आतापर्यंत आहेत तसेच आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची नवी संकल्पना समोर आणली. मात्र ज्या गरीब लोकांकडे फोन नाहीत त्यांच्याकडे स्मार्ट फोन आणि लॅपटॉप कोठून येणार हा प्रश्न निर्माण झाला होता. गोरगरीब पालकांच्या मुलांच्या शिक्षणाचे काय? असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र, सोलापूर महानगर पालिकेच्या शिक्षकांनी या प्रश्नांवर उपाय शोधत ज्ञानाची गंगा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम सुरु केलं आहे. यामुळे सोलापूर शहरातील हजारो विद्यार्थी कोरोना संकटातही रोज शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. (Solapur Municipal Corporation education board started initiative for inclusion of poor students in education)

सोलापूर महानगरपालिका शाळांमध्ये झोपडपट्ट्यांमधील विडी कामगार, रिक्षा चालक, फेरीवाले यांची मुलं मुली शिक्षण घेतात. मात्र, सध्या शाळा बंद आहेत ऑनलाईन शिक्षण सुरु असलं तरी महानगर पालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या पालकांकडे स्मार्ट फोन किंवा लॅपटॉप नसल्यानं त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. सोलापूर महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाने “शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या  दारी” ही अभिनव संकल्पना सुरु केली आहे.

“शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या दारी” या अभिनव संकल्पनेच्या माध्यमातून शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन स्वखर्चाने तयार केलेल्या नोट्स किंवा स्वाध्याय संच वाटप करून शैक्षणिक धडे देत आहेत. काही ठिकाणी शिक्षकांच्या घरातच शिक्षणाचे धडे दिले जात आहेत. या उपक्रमामुळे पालकांकडून शिक्षकांचे कौतुक होत असल्याचे मनपा शिक्षण मंडळाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले.

जून महिन्यात विद्यार्थ्यांचे गट तयार केले. ज्यांच्याकडे फक्त फोन आहेत त्यांना फोन करुन माहिती घेत होतो. गरीब विद्यार्थ्यांकडे फोन नव्हते त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. यानंतर कादर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली “शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विध्यार्थ्यांच्या दारी” हा उपक्रम सुरु केला. यादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं शिक्षण सुरु असल्याचं शिक्षिका झीनत शेख यांनी सांगितले.

“शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या  दारी” या उपक्रमामुळे लॉकडाऊन काळात मुलीला शिक्षण मिळाले, त्यामुळे तिचं नुकसान झालं नाही, असं हसीना जाफर शेख यांनी म्हटलं. “शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या  दारी” या उपक्रमाचा लाभ होत असल्याचं गोसिया या विद्यार्थिनीनं म्हटलं आहे.

सोलापूर महानगर पालिकेच्या मराठी ,तेलगू ,उर्दू ,कन्नड या माध्यमाच्या ५८ शाळांमधून हे उपक्रम सुरु करण्यात आले असून त्याचा विद्यार्थी फायदा घेत आहेत.

गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात. शोध नाही लागला तर किमान त्यातून एक संकल्पना तर जन्माला येतेच. त्याप्रमाणे “शिक्षकांची वारी, शिक्षणासाठी विद्यार्थ्यांच्या दारी” ही संकल्पना जन्माला आली आहे. शिक्षकांनी त्यांच्या प्रयत्नानं ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. त्यामुळे गोरगरिबांची मुलं शिक्षणाच्या मूळ प्रवाहातून दूर जात नाहीत ,उलट त्यांना आनंदायी शिक्षण मिळत आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत गरीब विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल लायब्ररी

ऑनलाईन शिक्षणाचा कंटाळा आला, शाळेची आठवण येतेय, नांदेडच्या चिमुकलीची मुख्यमंत्र्यांना भावनिक साद

(Solapur Municipal Corporation education board started initiative for inclusion of poor students in education)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *